बोंडारवाडी धरण कृती समिती ट्रायल पिट च्या मागणी साठी मा. ना. श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटणार

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी


नवी मुंबई : दि.१४ बोंडारवाडी धरण कृती समितीची कोपरखैरणे येथे रविवार १४ सप्टेंबर २०२५ ला जाहीर मीटिंग आयोजित केली होती. मीटिंग ची प्रस्तावना वैभव ओंबळे यांनी करत सध्याची धरणाची स्थिती आणि पुढील वाटचाल या वर सर्वाना माहिती दिली. सदरच्या मीटिंग ला जावळी तालुक्याचे जलनायक कै.विजयराव मोकाशी साहेब यांच्या २० सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली. 

मिटिंग साठी स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी उपस्थिती दर्शवली आणि ३ गावांच्या मागण्या पूर्ण कारण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्या शी मीटिंग होणे गरजेचे आहे असे सुचवले. 
तसेच ट्रायल पिट च्या कामाला गती मिळावी या सदर्भात जन आंदोलन उभे करावे असे काही युवा कार्यकर्त्यांनी सुचवले. कृती समिती लवकरच मा. ना. श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून ट्रायल पिट आणि ३ गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही असेल असे सांगितले.

सदरच्या मिटिंग ला ५४ गावातील युवा तरुणांनी विशेष उपस्थिती दाखवली. मीटिंग मध्ये स्वप्निलजी धनावडे, संतोष पवार, आनंदा ओंबळे, शशी बैलकर, संतोष पवार, महेंद्र पवार, योगेश पाडळे,  
लहू सुर्वे, संकेत पाटील, अनिल कदम आणि इतर युवा तरुण उपस्थित होते. तसेच नारायण शेठ सुर्वे, केशव कासुर्डे, रामचंद्र सुर्वे टेलर, सीताराम सुर्वे, सिद्धार्थ सपकाळ, तुकाराम धनावडे, रामाजी ओंबळे, राजेंद्र ओंबळे इत्यादी जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते. 

मिटिंग यशस्वी करण्या साठी जितेंद्र कासुर्डे, जनार्दन मोरे, प्रथमेश भणगे, अमोल ओंबळे यांनी प्रयत्न केले. येणाऱ्या मान्यवरांचे आभार विनोद शिंगटे यांनी मांडले.


न्यूज मराठी लाईव्ह 
नवी मुंबई

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने