प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मुंबई : दि.१४ मुंबई युवा कला महोत्सव २०२५ सन्मान महाराष्ट्राचा महाराष्ट्र न्यूज व पंचरत्न मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक , शैक्षणिक , वैद्यकीय , उद्योजक , साहित्य , कला , क्रीडा , राजकीय , सामाजिक ,सांस्कृतिक ,कृषी इ. पुरस्कार दिले जातात.
सामाजिक हस्तकला उत्कृष्ट पत्रलेखन पुरस्कार भणंग गावचे सुपुत्र आणि शासकीय लेखापरीक्षक विजय जाधव यांना सुंदर हस्ताक्षरात विविध नामांकित व्यक्तीमत्त्वांना उत्कृष्ट पत्रलेखनाबद्दल आणि सामाजिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र न्यूज १८ पोर्टल चॅनल आणि पंचरत्न मित्र मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन एक्सलन्स स्टार अवॉर्ड २०२५ (आदर्श लोकसेवा) हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
विक्रोळी मुंबई येथे झालेल्या एका शानदार समारंभात सुधीर सावंत (माजी खासदार) यांचे शुभहस्ते विजय जाधव साहेब यांना गोल्डन ट्राॅफी आणि ISO प्रमाणित सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.यावेळी मुंबई मराठी वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे,प्रसिद्ध कोळीगीत गायक आणि मराठी बिग बॉस फेम कलाकार संतोष चौधरी, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सागर नटराज, पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर,आयोजक संजय भोईर हे मान्यवर उपस्थित होते.
विजय जाधव यांना इंडियन एक्सलन्स स्टार अवॉर्ड पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी , डिजिटल सोशल मीडिया जावली तालुका अध्यक्ष सुनील (आण्णा ) धनावडे.तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भणंग, हनुमान उदय मंडळ भणंग,शासकीय लेखापरीक्षण विभागातील पदाधिकारी व मित्र मंडळ यांनी विजय जाधव यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मुंबई


Post a Comment