प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
केळघर (जावली) : दि.१६ आपल्या भागाच्या विकासासाठी भविष्याच्या उन्नतीसाठी विभागातील विकासाला चालना देणारा प्रकल्प बोंडरवाडी धरण या प्रकल्पासाठी आपणास सुद्धा तीव्र आंदोलन करावे लागेल तरच बोंडरवाडी धरणाचे ट्रायलपीठ होईल अन्यथा होणार नाही.
शनिवार दिनांक २०सप्टेंबर २०२५ रोजी जलनायक स्व. विजयराव मोकाशी साहेब यांचा तृतिय स्मृतिदिन आहे.
स्मृतीदिना निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे .
या दिवसी सर्वांनी एकत्र येऊन तिव्र आंदोलनाची तयारी करावीच लागेल.
विशेष करून करंजे ते मोरावळे व मोहाट ते धनकवडी या लोकांना एकत्र यावेच लागेल कारण बोंडारवाडी , वाहिटे , भुतेघर या गावच्या ग्रामथांचे म्हणने आहे की खालच्या लोकांना बोंडारवाडी धरणाची आवश्यकता नाही. त्यांना कण्हेर धरण आहे.
समोर कण्हेर धरण पाण्याने भरलेले आहे परंतु आपणास खरोखर पाण्याची आवश्यकता असते त्यावेळी पाण्याची पातळी खाली गेलेली असते मोटारी उघड्या पडलेल्या असतात त्यातूनही मोटारी १ ते २ किलोमीटर अंतरावर खाली सरकवून आपण पाणी उचलत आहे.
परंतु आपल्या कोट्याचे पाणी कन्हेर धरणातूनच औंधला दिले जाणार आहे त्यावेळी आपल्या शेतीला पाणी कोठून देणार व पिण्याचे पाणी कोटून आणणार म्हणून करंजे ते मोरावळे व मोहाट ते धनकवडी विभागातील शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे.
स्व. विजयराव मोकाशी साहेब यांचे स्वप्न होते बोंडारवाडी धरणातून ग्यावेल्टीने पाणी सर्व शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आले तर विज कर कमी होणार आहे. कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना पाणी शेतीला मिळणार आहे.
पिण्याचे पाणी मुबलक मिळणार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना धरणातून उचलून पाणी घेणे परवडत नाही म्हणून बोंडारवाडी धरण होणे गरजेचे आहे.
महू हातगेघर धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळाले पाहिजे या करीता त्या विभागातील शेतकऱ्यांनी संघर्ष केला म्हणून १२ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय बैठक लागली व झाली सुद्धा मंत्री महोदयांनी १५ दिवसात निर्णय घ्या म्हणून आदेश दिलेत .
मग आपण का गप्प आहोत आपणही संघर्ष करूया संघर्ष केल्या शिवाय बोंडारवाडी धरण्याची ट्रायल पीठ होणार नाही म्हणून आपणा सर्वांना विशेष करून करंजे ते मोरावळे मोहाट ते धनकवडी विभागातील शेतकरी बांधवांना विनंती आहे खरोखर आपणास बोंडारवाडी धरण हवे आहे का ? शेतीला पाणी हवे आहे का ? हवे असेल पाहिजे असेल तर
शेवटच्या श्वासा पर्यंत धरण व्हावे म्हणून ज्यांनी आपला प्राण गमावला ते स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांचा तृतीय स्मृतिदिना निमित्त शनिवार दिनांक २०सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय नांदगणे ( केळघर ) येथे शेतकरी मेळावा आयोजित केला आहे .
मेळाव्यास आपण सर्वजन उपस्तीत राहून एक निश्चय करूया जोपर्यंत ट्रायल पीठ होत नाही तो पर्यंत आम्ही संघर्ष करू हा निश्चय करूया संघर्ष शिवाय ट्रायल पीठ होणार नाही ट्रायल पीठ झाल्या शिवाय धरण होणार नाही .
ज्यांना धरण व्हावं वाटतं त्या गावातील सरपंच , उपसरपंच सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाचेअरमन सदस्य व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती.
न्यूज मराठी लाईव्ह
केळघर / जावली

Post a Comment