वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी बनाजी पाटोळे हिची पुणे येरवडा जेल पोलीस पदी नियुक्ती

श्री.लालासाहेब माने (पाटील)
प्रतिनिधी / वडूज (सातारा) 


सातारा : वडूज शिक्षण विकास मंडळाच्या हुतात्मा परशुराम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी बनाजी पाटोळे हिची पुणे येरवडा जेल पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल वडूज शिक्षण विकास मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. 24 मार्च 2025 रोजी पुणे येथे शिवाजीनगरला तिची ग्राउंड टेस्ट झाली यामध्ये गोळा फेक 100 मीटर धावणे व 800 मीटर धावणे यामध्ये उज्वल यश संपादन करून दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी पुणे या ठिकाणी त्याची लेखी परीक्षा झाली व नऊ मे 2025 रोजी या विद्यार्थिनीची पुणे येरवडा जेल पोलीस पदी नियुक्ती झाली.


हुतात्मा परशुराम विद्यालयाचे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी अनेक क्षेत्रांमध्ये चमकत असतात आणि अशा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार वडूज शिक्षण विकास मंडळाच्या वतीने व हुतात्मा परशुराम विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्या वतीने विद्यालयामध्ये सत्कार संपन्न होत असतो वैष्णवी बनाजी पाटोळे हिचे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण हुतात्मा परशुराम विद्यालय जुनियर कॉलेज या ठिकाणी झाले. कायम मनामध्ये जिद्द ठेवून अखंड साधना आणि तपश्चर्या करणारी विद्यार्थ्यांनी म्हणून अगदी कमी वयात तिला हे यश संपादन झाले. वैष्णवी चे वडील बनाजी पाटोळे हे याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून वडूज नगरपंचायतीचे ते नगरसेवक आहेत यासोबत वडूज शहरांमध्ये जय मल्हार भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून आज रोजी जवळपास 300 ते 400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सत्काराला उत्तर देताना वैष्णवी म्हणाली जर आपण लहानपणापासूनच एखादे ध्येय मनामध्ये ठेवले आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला तर नक्कीच यश संपादन होते.
 

मला लहानपणापासून वर्दीची आवड होती आणि या वर्दीसाठी मी पहाटे पाच वाजल्यापासून एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत मी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते हा सराव करत असताना मला अनेकांचे मार्गदर्शन लाभले यामध्ये या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक पर्यवेक्षक याचबरोबर संस्थेतील सर्व संचालकांचे मार्गदर्शन लाभले. माझ्यासमोर बसलेल्या सर्व मुला मुलींना माझी एकच विनंती असेल तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा यश नक्कीच तुमचा पाठलाग करत तुमच्या पाठीशी येत राहील.

यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक सुभाषराव येवले, प्रशांत उर्फ राजू शेटे, विद्यालयाचे माजी शिक्षक व संचालक ज्ञानेश्वर पंडित, शैलेश देशपांडे विद्यालयाचे प्राचार्य एस.आर.जाधव सर, पर्यवेक्षिका सौ.बी.एस.माने, पर्यवेक्षिका सौ.एसपी जोशी, ज्येष्ठ शिक्षक श्री.एके माने, श्री.भोकरे, श्री. धुळप श्री.पवार, सौ.भिंगारदिवे सौ.माने श्री.ए.एम.राऊत, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते. वडूज शिक्षण विकास मंडळाच्या वतीने वैष्णवीला तिच्या क्षेत्रातील पुढच्या परीक्षांना सामोरे जाऊन लवकरात लवकर खांद्यावरती स्टार यावेत यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री आर एस जगदाळे यांनी केले.



न्युज मराठी लाईव्ह 
सातारा / वडूज

Post a Comment

Previous Post Next Post