श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड (सातारा)
कराड : पंचायत समिती क्षेत्रामध्ये बऱ्याच शाळा कोणतीही परवानगी शिवाय चालू आहेत. KG पासून ते 12 वी वर्गापर्यंत प्रवेश घेतला जातो परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पुरेशा वर्ग खोल्या उपलब्ध नाहीत. शाळेच्या नियमानुसार इमारत नाही. ज्या इमारती आहेत त्या अधिकृत नाहीत. त्याला शासनाच्या नियमानुसार टाउन प्लॅनिंग ची परवानगी नाही. विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान नाही. ती जागा रहिवासी किंवा शेती विभागातील असून इमारत ही बेकायदेशीर बांधलेली असताना त्या ठिकाणी 12 वी पर्यंत वर्ग कसे भरवले जातात.? याच गोष्टीची कमाल आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये त्या पात्रतेचे शिक्षक नाहीत. प्रयोग शाळा, वाचनालय, सौचालये नाहीत.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कमी फी मध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देऊन फसवणूक केली जातेय. अशा शाळांना शासन मंजुरी कशी देते. कसलाही पाठपुरावा न करता शाळा राज रोस पने चालू आहेत. त्या कशा काय.?? व त्या कोणाच्या आशीर्वादाने चालतात, यावरती कोणाचेच नियंत्रण नाही का? असा प्रश्न मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले यांनी उपस्थित केला आहे.
यासाठी मा.जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना निवेदन देण्यात आले. 6 दिवसात अशा शाळांवर कार्यवाही करू असे आश्वासन मा. जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी दिले आहे. या सहा दिवसांमध्ये शाळेच्या अनधिकृत प्रकारामध्ये कारवाई झाली नाही तर मनसे विद्यार्थी सेना पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
न्युज मराठी लाईव्ह
कराड / सातारा