पंढरीच्या पायी वारीला निघालेल्या वारकऱ्यांना श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी यांच्या वतीने "प्रसादाचे" वाटप

श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)


सातारा : जावली तालुक्यातील तीर्थक्षेत्र नाचणीचे गाव कुसुंबी श्री. काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी यांचे वतीने लोणंद येथे जाऊन श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप केले. वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र कुसुंबी गाव या गावातील सर्व वारकरी बांधव आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे पाय दर्शन घेत असतात. वारकरी संप्रदायाचा वारसा जपत कुसुंबी गावातील भाविकांनी लोणंद मध्ये जाऊन पायीवारी दिंडीतील सर्व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करून माऊलींचे दर्शन घेतले. 

भगवंताच्या दिव्य तेजाने दशदिशा व्यापून टाकलेली पंढरी 'याची देही याची डोळा ' अनुभवण्यासाठी आषाढी व कार्तिकी एकादशीला वारकरी नित्य नियमाने पंढरपूरला जात असतात. वारीला जात असलेल्या वारकऱ्यांना श्रीक्षेत्र कुसूंबी येथील श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुसूंबी यांच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रामदास वेंदे,उपाध्यक्ष श्री.विजय वेदे, विश्वस्त श्री.संतोष चिकणे, ग्रुप ग्रामपंचायत कुसूंबीचे सरपंच श्री.मारुती चिकणे(बापू), उपसरपंच श्री.निर्वत्ती मोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री.नामदेव चिकणे,(गुरुजी )नेहरू युवा मंडळ कुसूंबीचे कार्यकर्ते,समिर वेंदे,अजय कुंभार,अशोक साळूंखे, राजेंद्र वेंदे यांच्या हस्ते वारकऱ्यांना लोणंद येथे पालखी सोहळ्यात प्रसाद वाटप करण्यात आले..

देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने नेहमीच सामाजिक कार्यासाठी देणगी देण्याचे कार्य हाती घेतले जाते, सांप्रदायिक वारसा अखंडपणे सुरू असलेल्या पालखी सोहळ्यात प्रसाद वाटप करुन आध्यात्मिक वारसा जतन केलेल्या देवस्थान ट्रस्टच्या प्रसाद वाटप उपक्रमाचे वारकरी संप्रदाय यांच्या कडून श्री. काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट कुसुंबी यांचे कौतुक होत आहे.


न्युज मराठी लाईव्ह 
सातारा / जावली

Post a Comment

Previous Post Next Post