बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)
खंडाळा / सातारा
दिल्ली येथे महाराष्ट्र सदन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार 2025 ने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांचा केला गेला सन्मान..
सातारा : सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील खंडाळा तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून डोंगर भागातील ओळखले जाणारे एक छोटेसे अतिट हे एक गाव या गावात विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी सर्वांगीन विकासाचा खारीचा वाटा उचलत असतात व गावच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात.
अतिट गावच्या विद्यमान आदर्श सरपंच या उपसरपंच व सदस्यांना व ग्रामस्थांना एकत्र घेऊन विविध सर्वांगीन विकास कामे करीत असतात.
अतिट गावाच्या सरपंच सौ. रुपालीताई जाधव या नेहमीच अतिट गावच्या सर्वांगीन विकासासाठी एकजुटीने सर्वांना घेऊन विकास कामे करीत असतात यामध्ये त्यांनी गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन योजना,बंदिस्त गटारे, डांबरी रस्ते, सिमेंट रस्ते,स्म्शानभूमी सुशोभीकारण, शेती जोड रस्ते, सांभामंडप,मंदिर सुशोभीकरण शाळा, अंगणवाडी, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असतात.
गावामध्ये विविध उपक्रम राबवून समाज प्रोभोधणाचे काम करीत असतात व सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचवत असतात. यामध्ये त्यांनी गावासाठी वोविध कंपनीचा सी एस आर निधी उपलब्ध करून गावाचा विकास साधला आहे. यामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प, एकात्मिक कृषी विकास प्रकल्प, एकत्मिक घनकचरा प्रकल्प, जल तारा प्रकल्प, जुन्या जल स्रोतांचे पुनरजीवन, सौर ऊर्जा, उपजीविका, महिला सक्षीमिकारण, शेतकरी... महिला बचत गट, असे विविध उपक्रम राबवून.. गावाचा सर्वांगीन विकासात शास्वत योगदान देत असतात.
केलेल्या कामाचे गावातून सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे..
शुभेच्छुक:- समस्त ग्रामस्थ मंडळ अतिट, ग्रामपंचायत अतिट गावातील तरुण मंडळ व तसेच विकास सेवा सोसायटी, तंटामुक्ती समिती, शालेय व्यवस्थापन समिती, महिला मंडळ अतिट, भजनी मंडळ अतिट...मुंबई पुणे मार्केट यार्ड.. सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवारांनी कोतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
न्युज मराठी लाईव्ह
खंडाळा / सातारा