श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)
महाबळेश्वर : कासवंड (चोरमलेवाडी) ता. महाबळेश्वर येथील चैतन्य कचरानाथ स्वामीनाम दिंडी सोहळा पायीवारी चे "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात पंढरपूरला प्रस्थान झाले. यावेळी शेकडो पायी वारकर्यांनी कासवंड येथील मंदिरात गर्दी गेली होती. कासवंड गावातून आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांची पालखी यात्रा भक्तिभावात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात रवाना झाली. "ज्ञानोबा-तुकाराम" च्या गजरात गावातील व परिसरातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतलेला दिसून आला.
वारीच्या प्रारंभस्थळी गावात अभिषेक, आरती, हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या हस्ते पालखीचे पूजन करून वारी मार्गस्थ झाली. या वेळी महिलांचा फुगडी, बालवारकरी, तसंच वृद्ध भक्तही हरिनामाचा जयघोष करीत सहभागी झाले. गावातील नागरिकांनी वारीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या, पुष्पवृष्टी केली आणि वारकऱ्यांना फराळ व पाण्याची व्यवस्था केली. वारी गावोगाव थांबत भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात टाळ, मृदंग वाजत, गाजत, शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरी नामाचा गजर करीत पंढरपूरकडे वाटचाल करणार आहेत.
या प्रवासात दापवडी, शेते, भिवडी, चिमणगाव गोटा, निढळ, म्हसवड, पिलीव, भाळवणी त्यानंतर दूध पंढरी येथे चैतन्य कचरनाथ स्वामी पायवारी नामदिंडी सोहळ्याचे तीन दिवसीय मुक्काम समस्थ वांगडे परिवार निवासस्थान दूध पंढरीसमोर पालखी मुक्कामी असून त्या ठिकाणी कीर्तन, हरिपाठ, भजन सेवा कार्यक्रम चालू राहतात.
न्युज मराठी लाईव्ह
महाबळेश्वर / सातारा