श्री.मंदार वैद्य
प्रतिनिधी / भिवडी (जावली)
भिवडी (जावली) : रयत सेवक श्री.विजयसिंह महामूलकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ श्री.धुंदीबाबा विद्यालय विद्यानगर भिवडी येथे दि. 18/06/2025 रोजी माननीय श्री.वसंत भाऊ मानकुंमरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विभागीय अधिकारी रायगड विभाग रयत शिक्षण संस्था सातारा माननीय श्री.विजयसिंह पिसाळ उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुधाकर शिंदे तसेच सर्व स्टाफ यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. श्री.विजयसिंह महामूलकर यांच्या सेवेचा कालावधी रयत शिक्षण संस्थेमध्ये उच्चांकी ठरला आहे. त्यांच्या सेवेचा कालावधी 42 वर्ष 6 महिने 25 दिवस एवढा झाला. विशेष म्हणजे अभिष्टचिंतन आणि सेवानिवृत्ती एकाच दिवशी आली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा मा.श्री.वसंत भाऊ मानकुमरे तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे तसेच जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीपजी शिंदे, भिवडी गावचे सरपंच श्रीकांत निकम, सोनगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अमितजी शिंदे तसेच राष्ट्रवादी जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रतीकजी कदम उपस्थित होते.
शाळा समितीचे सदस्य जगन्नाथ पिसाळ प्राचार्य निकम, भरत साळुंखे, माने व्ही एम, निकम डी जी आणि महामूलकर कुटुंबीय आप्तेष्ट उपस्थित होते. श्री.विजयसिंह महामुलकर यांचा संस्थेतील प्रदीर्घ सेवा कार्याचा गुणगौरव सर्व वक्त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच उपस्थित सर्वांनी श्री.विजयसिंह महामुलकर यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा ही दिल्या.
न्युज मराठी लाईव्ह
भिवडी / जावली