प्रकल्पग्रस्ताचे उर्वरित प्रश्न कालमर्यादेत सोडवण्याचे पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांचे प्रशासनाला आदेश.

मेढा (जावली) प्रतिनिधी / श्री.बजरंग चौधरी 


पुणे : सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या मागणीवरून पुनर्वसन आणि मदतकार्य मंत्री नामदार मकरंद (आबा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय कार्यालयात सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर अतिशय सकारात्मक आणि निर्णायक बैठक संपन्न झाली. 

या बैठकीत प्रामुख्याने जावली तालुक्यातील कण्हेर, महू हातगेघर, वाई तालुक्यातील धोम तसेच सातारा तालुक्यातील उरमोडी इत्यादी प्रकल्पतील धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर प्रकल्पनिहाय चर्चा झाली. १९७६ पूर्वीचे जे धोम, कण्हेर सारखे प्रकल्प आहेत, त्यांच्या कब्जे हक्काची रक्कम शासनाकडे १००% जमा आहेत त्या संबंधित सकारात्मक निर्णय होऊन अशा प्रकल्पग्रास्थ्यांच्या जमीन वाटपचा निर्णय घेण्याला तत्वतः मान्यता देऊन, माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणुन अशा प्रकल्पग्रस्थांची संख्या निश्चित करून शासनाच्या मान्यतेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

येत्या काळात १९७६ पूर्वीच्या परंतु अजूनही जमीन वाटप न झालेल्या धरणग्रस्तांच्या बाबतीत जमीन वाटपाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यात आला. महू हातगेघर प्रकल्पच्या बाबतीत.
हातगेघर उपसा सिंचन योजनेस येत्या हिवाळी अधिवेशनात मान्यता देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व नामदार मकरंद पाटील आबा यांनी घेतला.तसेच दोन्ही प्रकल्पतील ज्या शेतकऱ्यांनी काही कारणास्तव वाटप झालेल्या जमिनी ऐवजी उर्वरित शिल्लक लँड बँकेतील उपलब्ध असलेल्या व कसण्या योग्य ज्या जमिनी प्रकल्पग्रास्तानी पसंत करून बदली प्रस्ताव केलेले आहेत, त्यांना विहित कालमर्यादेत मान्यता देऊन बदली प्रस्तावास तात्काळ मान्यता द्यावी. असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

पानस आणि महू टोम्पेवाडी येथील सांडव्यातील बाधित जमिनीना पुनर्वसन ऐवजी एकरकमी पॅकेज देण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने शासनास सादर करावा, त्यावर आम्ही जवळच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता देऊ असे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले. त्याचप्रमाणे हातगेघर सोबतच टोम्पेवाडी, भोगवली, महू-पिंपळी येथील ही उपसा सिंचन योनेचा स्वतंत्र प्रस्ताव पाटबंधारे विभागाने सादर करावा त्यास शासनाकडून लवकरात लवकर मान्यता मिळवून दिली जाईल असे नामदार बाबाराजेंनी सांगितले.

येत्या १५ दिवसात महू प्रकल्पच्या जवळपास शनिवार - रविवार सुट्टीचा दिवस बघून उर्वरित सर्वच स्थनिक प्रश्नांसाठी जिल्हा प्रशासनाने नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कॅम्प चे आयोजन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. 

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नावर बैठक झाल्यामुळे दोन्ही मंत्री महोदयांचे धरणग्रस्त संघटनेच्या वतीने श्रीहरी गोळे आभार व्यक्त केले. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी, उपाभियंता,सातारा, वाई प्रांत अधिकारी, सातारा, जावली, वाई चे तहसीलदार व विविध धरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


न्युज मराठी लाईव्ह 
जावली / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post