कराड प्रतिनिधी / श्री.अनिल मोरे
कराड : येथील कडेगाव नगरपंचायत पथ विक्रेते शासन समिती सदस्य पदी गणेश भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर उपस्थित पथ विक्रेत्यांशी बोलताना गणेश भोसले पुढे म्हणाले, खऱ्या अर्थाने पथ विक्रेते समितीचे मुख्य कार्य हे आहे की, हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब विक्रीत्याला विक्री करण्यासाठी योग्य जागा मिळवून देणे, त्यांची नोंदणी करणे आणि पथ विक्रेत्यांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही आहे.
ही समिती पथ विक्रेत्यांच्या हिताचे रक्षण करत असते, ज्यामुळे त्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावते सुधारते. त्यामुळे मला अभिमान वाटतो की, मी एका सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असून, मलाही सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वीही मी सामाजिक कार्यामध्ये गोरगरीब लोकांसाठी नेहमी सहभागी राहिलेलो आहे. असे ते म्हणत होते.
या कार्यक्रमा वेळी कडेगाव नगरपरिषद मुख्याधिकारी पवन सुरेश मेत्रे, कडेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, मा. विरोधी पक्षनेते उदय देशमुख, नगरसेवक युवराज रजपूत, नगरसेवक निलेश लंगडे, नगरसेवक बबन रासकर, राजेंद्र दीक्षित, महेश भोसले, अरुण मोरे, रमेश भोसले, रुपेश चौगुले, तसेच आदी पथ विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment