हर घर तिरंगा अभियान मामुर्डीत

प्रतिनिधी : बजरंग चौधरी


सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संपत धनावडे यांचेकडून वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप


मेढा : दि.१३ जावली तालुक्यातील आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी, ग्रामपंचायत मामुर्डी, अंगणवाडी केंद्र मामुर्डी येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
मामुर्डीचे सरपंच जगन्नाथ धनावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे, उपाध्यक्ष बजरंग चौधरी, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव धनावडे, सविता धनावडे, रंजना धनावडे ,ऑपरेटर पल्लवी शेलार , ग्रामस्थ व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
    
यावेळी मामुर्डी गावचे ग्रामस्थ सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संपत धनावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले.


न्युज मराठी लाईव्ह 
मामुर्डी / जावली



Post a Comment

Previous Post Next Post