गाडीतून अनधिकृत किटकनाशक विक्री; कृषी विभागाची कारवाई, कंपनीवर गुन्हा दाखल


गाडीतून फिरत जीएस कंपनीचे कीटकनाशक व खतांची अनधिकृतपणे विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला, या प्रकरणी कृषी विभागाकडून कारवाई करत मुद्देमाल जप्त केला.

सातारा : साताऱ्यातील अजिंठा चौकात अनधिकृत रित्या जी एस कंपनीची कीटकनाशकांची गाडीतून विक्री केली जात होती. कृषी विभागाकडून या प्रकरणी कारवाई करत गाडीतून तब्बल १ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर कंपनीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

सातारा कृषी विभागाकडून सदरची कारवाई करण्यात आली आहे. अजिंठा चौक परिसरात गाडीतून जी एस ऍग्रो या कंपनीची खते आणि औषधे अनधिकृत रित्या कीटकनाशकाची विक्री करण्यात येत होती. याबाबतची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला समजली. यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून याची खात्री केली असता गाडीमध्ये १ लाख २३ हजार ९४० रुपयांची कीटकनाशके आढळून आले आहेत.

कंपनीविरोधात गुन्हा दाखल

सातारा जिल्ह्यातील शिवथर तडवळे सातारा रहिमतपूर आणि पुसेगाव या भागात या कंपनीची कीटकनाशके विक्री केल्याची माहिती या तपासात समोर आली. याप्रकरणी कीटकनाशक कायदा अधिनियम, खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी जीएस ऍग्रो कंपनीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व मुद्देमाल जप्त

दरम्यान कारवाई करण्यात आलेला सर्व मुद्देमाल कृषी अधिकारी गुणवत्ता निरीक्षक यांनी जप्त केला आहे. याआधी देखील या कंपनीकडून कोण कोणत्या भागामध्ये ही औषधे विकली आहेत. ज्यात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याचा तपास कृषी विभागाच्या भरारी पथकाने सुरू केला आहे. मात्र अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.


न्युज मराठी लाईव्ह 
सातारा

Post a Comment

Previous Post Next Post