हर घर तिरंगा अभियानांतर्गत जावली तालुक्यातील मामुर्डीत पसायदान गायन

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी 
मेढा / जावली 


मामुर्डी (जावली) : हर घर तिरंगा अभियान मामुर्डी गावात राबविण्यात येत आहे. आज हर घर तिरंगा अभियानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी, ग्रामपंचायत मामुर्डी, अंगणवाडी केंद्र मामुर्डी येथे ध्वजारोहण करण्यात आले.
 

१५ ऑगस्ट २०२५ रोजी श्री संत ज्ञानदेव महाराजांची ७५० जयंती आहे. या जयंती निमित्त मामुर्डी येथे दिंडी आयोजन करण्यात आले होते. दिंडी नंतर सर्वजण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सामुहिक पसायदान गायन करण्यात आले.
   
या कार्यक्रमाला मेढा केंद्राचे केंद्रप्रमुख मिलन मुळे,मामुर्डीचे सरपंच जगन्नाथ धनावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय धनावडे, उपाध्यक्ष बजरंग चौधरी, ग्रामपंचायत सदस्या सविता धनावडे, उद्योजक नारायण धनावडे, ग्रामसेवक, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.


न्युज मराठी लाईव्ह 
मामुर्डी / जावली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने