धक्कादायक ! 'जावली चे गट शिक्षण अधिकारी संजय श्रीरंग धुमाळ यांना आठ लाखांचा गंडा'; लिंक ओपन केली अन् भलतचं घडलं; सातारा जिल्ह्यात खळबळ


सातारा : ७ ते १३ मे दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली होती. ती लिंक ओपन करून त्यांनी त्यात काही माहिती भरली. तेव्हापासून त्यांच्या बँक खात्यातून पैसे जाऊ लागले.


ऑनलाइन घोटाळ्यात जावली गट शिक्षण अधिकारी यांची ८ लाख रुपयांची फसवणूक; सातारा सायबर गुन्हे पोलिसांकडून फिशिंग हल्ल्याचा तपास.


याबाबत गट शिक्षण अधिकारी संजय श्रीरंग धुमाळ (रा. गोडोली, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. ७ ते १३ मे दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली होती. ती लिंक ओपन करून त्यांनी त्यात काही माहिती भरली. तेव्हापासून त्यांच्या बँक खात्यातून पैसे जाऊ लागले. वरील कालावधीत वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यातून एकूण आठ लाख १० हजार २६६ रुपये काढले गेले.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर संजय धुमाळ यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर याबाबतची तक्रार नोंदवून घेण्यात आली. उपनिरीक्षक अनिल जायपात्रे तपास करत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यामध्ये शहर पोलिसांनी चार संशयित निष्पन्न केले आहेत ते परराज्यातील आहेत. त्यांच्या खात्यातून गेलेल्या रकमेपैकी सुमारे दीड लाखांची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात गोठविण्यात आली आहे.

न्युज मराठी लाईव्ह 
सातारा


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने