79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानगेघर येथे मोठ्या उत्साहात साजरा


रानगेघर (जावली) : 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानगेघर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय नामदेव गोळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

तदनंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत, समूहगीत गायन आणि स्वच्छ सुजल गाव संकल्प अंतर्गत शपथ घेण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली तसेच देशभक्तीपर गीतावर आधारित संगीतमय कवायत सादर करण्यात आली. नवसह्याद्री डोंगरी बहुउद्देशीय संस्था रानगेघर यांचे मार्फत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

श्री दत्ता विठ्ठल करंदकर यांचे मार्फत सर्व विद्यार्थ्यांना आयडेंटी कार्ड देण्यात आली. या कार्यक्रमासाठी आदिनाथ नामदेव मोरे (सरपंच), उपसरपंच, पोलीस पाटील, रानगेघर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, काळेश्वरी दूध संस्था चेअरमन, ग्रामस्थ, महिला, नवतरुण मंडळाचे सदस्य उपस्थित होते. शेवटी श्री खरपाडे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

 

न्यूज मराठी लाईव्ह 
रानगेघर / जावली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने