श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)
मेढा (जावली) : तीर्थक्षेत्र नाचणीचे गाव कुसुंबी गावचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील श्री.एकनाथ आनंदराव सुतार यांना मा. प्रांताधिकारी श्री.विकास व्यवहारे साहेब, तहसिलदार हणमंत कोळेकर साहेब, नायब तहसिलदार मुनावळे साहेब, नायब तहसिलदार श्री.संजय बैलकर साहेब यांच्या उपस्थितीतपुरस्कार देण्यात आला. जावली तालुक्यात आपल्या उत्कृष्ट व प्रेरणादायक कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्कारासाठी विविध स्तरावरून त्याचे अभिनंदन करण्यात आले.
आपल्या निस्वार्थ सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान अत्यंत गौरवाचा क्षण आहे. संपूर्ण जावली तालुका तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री.सुहास भोसले व पदाधिकारी यांनी पोलीस पाटील एकनाथ सुतार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील एकीकरण संघ, जावळी तालुका पोलिस पाटील संघटना,
महसूल आणि पोलिस प्रशासन जावळी (मेढा) यांनी या पुरस्कार बदल आनंद व्यक्त केला. मी केलेल्या प्रामाणिक कामाबद्दल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे या पुरस्काराचा मानकरी ठरलो असे मत एकनाथ सुतार यांनी व्यक्त केले.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली


Post a Comment