शैक्षणिक वर्ष 2025/26 हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज येथे होतकरू गरजू विध्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

श्री.लालासाहेब माने (पाटील)
प्रतिनिधी / वडूज (सातारा)


वडूज (सातारा) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मित्र परिवार पुणे यांचे सदस्य सुभाष जोशी यांचेमार्फत या विद्यालयातील गरजू होतकरू विध्यार्थी विध्यार्थिनी साठी चाळीस हजार रुपये किंमतीच्या वह्या देण्यात आल्या. याचे वितरण वडूज शिक्षण विकास मंडळ वडूज चे संस्था पधादिकारी आणि संचालक सदस्य यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य श्री एस आर जाधव यांनी केले. संस्थेच्या पदाधिकारी विद्यमान संचालक यांचे शुभहस्ते वह्यांचे वितरण करण्यात आले.


या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक विश्वासराव काळे, सुभाष काका येवले, अशोकराव भंडारे, डॉक्टर हेमंत पेठे, श्री गजाननराव शेटे, प्रशांत किसनराव शेटे, गोविंद शेठ भंडारे,विजयराव म्हामने, शैलेश देशपांडे, उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक मित्रपरिवार यांचेमार्फत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करत असताना संचालक डॉक्टर हेमंत पेठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 

गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदत करत असताना आपण समाजाचे काहीतरी ऋण लागतो या भावनेने मदत करणारी मंडळी आज समाजात आहेत म्हणून गरजू विध्यार्थी यश्याच्या शिखरावर पोहचत आहेत. संस्था संचालक डॉक्टर हेमंत पेठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले सतपात्री दान याला म्हणतात जे गरजू विध्यार्त्यांसाठी कार्य करतातं. राष्टीय स्वयंसेवक संघ मित्र परिवार पुणे याबाबत काठीबद्ध असून समाजातील गरजू लोकांपर्यंत पोहचत आहेत हे अभिमनस्पद आहे.


जेष्ठ संचालक विस्वास भाऊ काळे पाटील यांनी राष्टीय स्वयंसेवक संघाला ध्यान्यवाद दिले. प्रस्ताविक प्राचार्य शिवाजीराव जाधव यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका विध्यार्थी आणि पालक उपस्थित होते. जवळपास चाळीस हजार किंमतीच्या वह्या मुला मुलींना देण्यात आल्या. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच संघांचे भाग्य असे उद्गार विश्वास भाऊ काळे पाटील यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमास संचालक सुभाष काका येवले, संचालक विश्वासराव काळे पाटील, संचालक अशोक भंडारे, प्रशांत किसनराव शेठे, डॉक्टर हेमंत पेठे, गजानन शेठे, विजय म्हामणे,. उद्योजक गोविंद शेठ भांडरे, शैलेश देशपांडे, प्राचार्य एस आर जाधव, पर्यंवेक्षिका सौ बी एस माने, सौ एस पी जोशी, सर्व शिक्षक शिक्षकेतीर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्रिडा विभाग प्रमुख आणि शिस्त विभाग प्रमुख राजेंद्र जगदाळे यांनी केले. उपस्थितांचे आभार पर्यंवेक्षिका सौ एस पी जोशी यांनी मानले. सुभाष जोशी साहेब यांना सर्वांनी धन्यवाद दिले.






न्युज मराठी लाईव्ह 
वडूज / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post