कुसुंबी आरोग्य केंद्राच्या अर्चना चिकणे सर्वोत्कृष्ट आशा गटप्रवर्तक पुरस्काराने सन्मानित

श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)


मेढा (जावली) : जिल्हा परिषद सातारा यांच्याकडून दिला जाणारा सन 2023 -24 या वर्षातील कामावर आधारित दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट आशा गटप्रवर्तक पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबीच्या गटप्रवर्तक सौ अर्चना पंढरीनाथ चिकणे (शेलार) यांना मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जावली तालुक्याच्या दुर्गम दक्षिण विभागामध्ये आशांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला उत्तम प्रकारे आरोग्य सेवा त्या देत आहेत.प्रत्येक गावामध्ये आशांच्या बरोबरीने राष्ट्रीय 56 सेवा पुरवण्याचे काम त्याउत्तम प्रकारे करत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊनच जिल्हा स्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
 
या सन्मानाबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव,कुसुंबी चे सरपंच श्री मारुती चिकने,पोलीस पाटील एकनाथ सुतार, करंडीच्या सरपंच सौ रुपाली शेलार, श्री देवेंद्र सुतार, श्री संजय वांगडे,त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुर जगदाळे,डॉ. इंद्रजीत दबडे,आरोग्य निरीक्षक श्री सतीश मर्ढेकर, श्री सुधाकर बोधे, श्री अनिल दळवी,श्री तालुका समूह संघटक श्री किरण जाधव,आरोग्य सहायिका श्रीमती सुवर्णा जाधव आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी वर्ग, रुग्ण कल्याण समिती, कुसुंबी ग्रामस्थ यांनी गटप्रवर्तक अर्चना चिकणे यांचे अभिनंदन केले.



न्युज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली

Post a Comment

Previous Post Next Post