श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी : कराड / सातारा
कराड (सातारा) : येथील शिवाजी शिक्षण संस्थेत सुमारे 32 वर्षे इतकी प्रदीर्घ सेवा केलेल्या शिक्षिका सौ.संजीवनी अशोक पवार यांनी संस्कारशील पिढी घडवण्याचे उच्चतम कार्य केल्याचे गौरवोद्गार एडवोकेट सतीश पाटील यांनी काढले. शिक्षिका सौ.संजीवनी अशोक पवार यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवताना एडवोकेट सतीश पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र माने हे होते. एडवोकेट सतीश पाटील बोलताना पुढे म्हणाले सौ.पवार मॅडम या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षिका होत्या.
त्यांनी विज्ञान व गणित हे क्लिष्ट विषय सुद्धा सोप्या पद्धतीने मुलांना शिकवले त्यामुळे मुलांच्यामध्ये या विषयांची भीती कमी झाली व शिक्षणाची आवड निर्माण झाली. त्याचप्रमाणे पवार मॅडम यांनी ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती गरीब आहे अशा मुलांना विशेष करून त्यांनी ड्रेस,शालोपयोगी साहित्य, मुलांची शैक्षणिक फी आदी बाबत विद्यार्थ्यांना फार मदत करीत होत्या. विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून त्यांनी शाळेमध्ये काम केले तसेच त्यांच्या हाताखाली शिकलेली मुले समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी आहेत व समाजाची सेवा करत आहेत.
त्याचप्रमाणे जे मुले अत्यंत गरीब होती त्यांना लिहायला वाचायला येत नव्हतं. अशा मुलांना सुद्धा त्यांनी स्वतः लिहायला वाचायला शिकविले व आज ती मुले समाजामध्ये आपला छोटा मोठा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे आहेत.त्याचप्रमाणे सौ पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विपश्यना मधील आनापाणा या मेडिटेशनच्या माध्यमातून मुलांच्या लहान मुलांच्यावर चांगले योग्य ते संस्कार केले व प्रेरणा दिली. त्यामुळे मुलांचे शाळेमधील उपस्थिती वाढली व मुलांच्या शाळेतील प्रगती सुधारली. त्यामुळे मुलांच्या मधील आपापसातील भांडणे, वाद, हेवेदावे इत्यादी यांचे प्रमाण कमी झाले व विद्यार्थी सजग झाले.
त्यांची सेवा कालावधी महाराष्ट्र हायस्कूल, विठामाता हायस्कूल, शिवाजी हायस्कूल मसूर व शिवाजी हायस्कूल कराड या ठिकाणी त्यांनी सुमारे 32 वर्ष प्रदीर्घ सेवा केली. सौ.पवार मॅडम या शाळेमध्ये कडक शिस्तीच्या होत्या. त्यामुळे मुलांच्यामध्ये आदरयुक्त भीती होती. एडवोकेट सतीश पाटील यांनी सौ.पवार मॅडम यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे सर्व ज्येष्ठ संचालक, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.पवार मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय बनसोडे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या वेळी बऱ्याच मुलांनी आपले सौ पवार मॅडम यांचे विषयी मनोगत व्यक्त केले व कृतज्ञता व्यक्त केली.
न्युज मराठी लाईव्ह
कराड / सातारा



Post a Comment