श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी : कराड / सातारा
सातारा : आज शनिवार दिनांक 12/07/2025 रोजी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना सातारा ची जिल्हास्तरीय सहविचार सभा ग्रामविकास भवन सातारा येथे जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली आणि बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी आरोग्य कर्मचारी बांधवांच्या समस्या सोडवण्याबाबत संघटनेमार्फत ठोस पाऊले उचलण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
यामध्ये जिल्हा परिषद सातारा कडील आरोग्य कर्मचारी यांचे नियमित मासिक वेतन 2 ते 3 महिने प्रलंबित राहत असून हे वेतन वेळेवर न झाल्यास संघटनेमार्फ ऑनलाईन हजेरीवर बहिष्कार तसेच रिपोर्टिंग बंद करण्याबाबतचे निवेदन मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्याचे ठरले.तसेच सेवेत नव्याने रुजू आरोग्य कर्मचारी यांचे सेवाविषय प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
हिवताप विभागडील आरोग्य कर्मचारी यांचे विनंती बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धत राबवून करणे,एकूण रिक्त पदांपैकी 25 टक्के पदे सरळ सेवेने भरली असून उर्वरित रिक्त 75 टक्के पदांवर पदोन्नती होण्यासाठी विभागीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले.
यासोबतच जिल्हा संघटना राज्य कार्यकारिणी बरोबर करत असलेल्या कामकाजाची माहिती कर्मचारी बांधवांना देण्यात आली.यामध्ये आरोग्य सेवक पदनाम बदल,वेतन त्रुटी दूर करण्यासाठी संघटनेने केलेलं प्रयत्न,ऑनलाईन कामकाज करण्यासाठी इतर संवर्गीय कर्मचाऱ्याप्रमाणे आरोग्य सेवक बांधवांना मोबाईल भत्ता मंजूर करण्यासाठी पाठपुरावा,दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी मिळण्यासाठी संघटनेने केलेले प्रयत्न यांची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी कार्यक्षेत्रात कर्मचारी बांधवांना कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.यावेळी नवीन कर्मचारी बांधवांचे संघटनेमार्फत स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष गणेश दहिफळे,जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील,जिल्हा सचिव श्रीकांत माळवे,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रामहरी तांदळे, सुखदेव वायदंडे,जिल्हा उपाध्यक्ष सचिन राठोड, अमोल गंबरे, प्रशांत तायडे, संदीप साळुंखे,संघटक रोहित भोकरे, महेश जाधव श्री हणमंत बरकडे यांचेसह बहुसंख्य कर्मचारी बांधव उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा