प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा / जावली
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या लढ्याला यश -दत्ताभाऊ काकडे
सातारा : राज्यात मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र वेळेवर दाखल न केल्यामुळे सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली होती या संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन अपात्र वरलेल्या सदस्यांना सरपंचांना एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात येऊन या सरपंचांना उपसरपंचांना व सदस्यांना अपात्र करु नये अशी मागणी करण्यात आली होती.
विधान परिषदेमध्ये आ. श्रीकांत भारतीय यांनीही या संदर्भात सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी केलेल्या पाठपुरावाचा उल्लेख करत या सर्व सरपंचांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती तसेच विधानसभेमध्ये ही अनेक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा याबाबत करत या सरपंचांना एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती.
राज्यामध्ये सन्मानित सरपंच आणि विकसनशील गाव या संदर्भात काम करणाऱ्या सरपंच परिषदेच्या राज्य आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून या सरपंचांचे पद हे वाचले पाहिजे छोट्या छोट्या जातीतील लोकांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे ती सरकारने हिरावून घेऊ नये अशी भूमिका सरपंच परिषद मुंबईची होती असे परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी सांगितले.
जात पडताळणी कार्यालयाकडून खोडसाळपणा
वास्तविक पाहता जात प्रमाणपत्राच्या पडताळणी कार्यालयाकडून जात प्रमाणपत्र देण्याला प्रचंड विलंब लागत होता तसेच काही सरपंचांनी तहसीलला प्रमाणपत्र जमा करूनही ते जिल्हाधिकाऱ्याकडे न गेल्याने त्यांनाअपात्र करण्यात आले होते.
या सर्व बाबी सरपंच परिषदेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडल्या होत्या याची दखल घेत सरकारने या सर्व अपात्र झालेल्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना जात प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी एक वर्षांची मुदत वाढ दिल्याने आता अपात्र झालेल्या या सर्वांना पुन्हा एकदा गावचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी या संदर्भात दूरध्वनीवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार जी गोरे आमदार श्रीकांत भारतीय यांचे आभार मानले व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचे सरपंच परिषदेच्या वतीने आभार मानले.
राज्यातील हजारो सदस्यांचे सदस्य अबाधित राहिले आहे सरकारने त्यांना मुदतवाढ दिल्याने आज सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले यावेळी राज्य कोर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे , कोर कमिटी राज्य उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे , प्रदेश कोषाध्यक्ष आनंद जाधव , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजमल भागवत , सातारा जिल्हा सरचिटणीस शत्रुघन धनवडे , राजाराम पोतणीस प्रदेश सरचिटणीस यावेळी उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली