जावली तालुक्यात चोरीचे सत्र सुरुच, सोन्यासह पैशावर डल्ला..!

बातमी: श्री.अनिल करंदकर (पाटील)
मेढा / जावली 


मेढा : दि.11 जावली तालुक्यातील चोरीचे सत्र सुरु असताना कुडाळ विभागानंतर आता मेढा विभागाकडे घरफोडीचे प्रमाण वाढले असून रिटकवली गावामध्ये तीन ठिकाणी घरफोडी झाली आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यां सह पैशावर ही चोरांनी (दि. १०) रोजी रात्री डल्ला मारला असल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली असून साधारण एक लाख छप्पन्न हजार चारशे रुपयाची मालमत्ता व रोकड असल्याचे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे.

याबाबत दिलेल्या माहितीनुसार अनुक्रमे रिटकवली शेखर श्रीकांत दळवी, अरुण वसंत दळवी, अरविंद सुरेश मर्देकर, शंकर बाबुराव मर्देकर यांचे बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरी झाली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

यामध्ये शेखर श्रीकांत दळवी यांचे घरातील पस्तीस हजार रुपये रोख आणि चारशे रुपये किमतीचे लहान मुलांचे बारशात मिळालेले पायातील अंदाजे ४ ग्रॅम वजन चांदीचे दोन पट्ट्याचे जोड जु.वा.कि.अ. तसेच अरूण वसंत दळवी यांचे घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम आणि अट्टेचाळीस रुपये किमतीची एक अंदाजे १२ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन जु.वा.कि. अ. तसेच अरविंद सुरेश मर्डेकर यांचे घरातील तीस रुपये आणि छत्तीस रू. किमतीचे अंदाजे ४ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी सोन्याचे तीन मनी बारशामध्ये मिळालेले लहान मुलांच्या ६, अंगठी, ३ बदाम त्याचे एकुण वजन अंदाजे ५ ग्रॅम असलेले असे एकूण ९ ग्रॅम वजनाचे जू. वा.की.अं दोन हजार रूपये किमतीचे अंदाजे 20 ग्रॅम वजनाच्या लहान मुलांचे बारशातील मिळालेल्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण 1,56,400₹ एक लाख छप्पन्न हजार चारशे रुपये किमतीची मालमत्ता अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

याबाबत मेढा पोलीस ठाण्यात कलम 123/2025.BNS-331(3),331 (4), 305 प्रमाणे अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला असून पीएसआय दिघे तपास करीत आहेत.

दरम्यान गवडी गावामध्येही चोरी झाल्याची चर्चा असून गावामध्ये दक्षता कमिट्या सक्रीय होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नागरीकातून व्यक्त केले जात आहे.


मेढा पोलीस ठाणे गुरनं व कलम - 123/2025.BNS- 331(3),331(4),305 प्रमाणे

फिर्यादी नाव,पत्ता व वय - शेखर श्रीकांत दळवी वय 41 वर्षे व्यावसाय इलेक्ट्रॉनिक दुकान शिक्षण बीए जात हिंदू तेली सध्या राहणार प्राईम रेसिडेन्सी निहाल नगर सैदापूर तालुका जिल्हा सातारा मुळगाव राहणार रिटकवली तालुका जावली जिल्हा सातारा 
अटक/पाहिजे आरोपी नाव - अज्ञात 

गुन्हा घडला ठिकाण - मौजे रिटकवली तालुका जावली जिल्हा सातारा गावचे हद्दीत फिर्यादी यांचे बंद घराचे तसेच गावातील अरुण वसंत दळवी, अरविंद सुरेश मर्ढेकर, शंकर बाबुराव मर्ढेकर. यांची बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून

चोरीस गेला माल - 
शेखर श्रीकांत दळवी यांचे घरातील चोरीस गेले मालाचे वर्णन खालील प्रमाणे
1) 35,000/- रुपये रोख 10, 20, 50, 100 रुपयेच्या चलनी नोटा
२) 400/- रुपये किमतीचे लहान मुलांचे बारशात मिळालेले पायातील अंदाजे 4 ग्रॅम वजन चांदीचे दोन पट्ट्याचे जोड जु.वा.कि.अ.

अरूण वसंत दळवी यांचे घरातील चोरीस गेले मालाचे वर्णन खालील प्रमाणे-
१) 5,000/-रुपये रोख रक्कम त्यामध्ये 100 व 500 रुपये दराच्या चलनी नोटा
२) 48,000/- रुपये किमतीची एक अंदाजे 12 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन जु.वा.कि. अ.

अरविंद सुरेश मर्ढेकर यांचे घरातील चोरीस गेले मालाचे वर्णन खालील प्रमाणे
१) 30,000/- रुपये व्यये 10, 100, 500 चलनी नोटा
२) 36,000/- रू. किमतीचे अंदाजे ४ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी सोन्याचे तीन मनी बारशामध्ये मिळालेले लहान मुलांच्या 06 अंगठी. 03 बदाम त्याचे एकुण वजन अंदाजे 05 ग्रॅम असलेले असे एकूण ९ ग्रॅम वजनाचे जू .वा.की.अं
3) 2,000/- रूपये किमतीचे अंदाजे 20 ग्रॅम वजनाच्या लहान मुलांचे बारशातील मिळालेल्या चांचीच्या पट्ट्या 
एकूण-1,56,400रू

गुन्हयाची थोडक्यात हकिकत - दि.10/7/25 रोजीच्या सायंकाळी 06.00 वा.ते.दि. 11/7/25 रोजीच्या पहाटे 03.30 वा.चे. दरम्यान मौजे रीटकवली तालुका जावली जिल्हा सातारा गावच्या हद्दीत फिर्यादी यांचे बंद घराचे तसेच त्यांचा चुलत भाऊ अरुण वसंत दळवी त्यांच्या गावातील अरविंद सुरेश मर्ढेकर यांच्या घराचे कुलूप व कडी कोंडा कोणीतरी अज्ञात इसमाने बंद घरामध्ये प्रवेश करून घरातील वरील वर्णनाचा मुद्यमान आमच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरी करून नेहला आहे तरी शंकर बाबुराव मर्ढेकर यांच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून चोरी करण्याच्या प्रयत्न केला आहे म्हणून माझी आज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार आहे.

तपासी अधिकारी नाव मोबाईल नंबर - श्रेणी पीएसआय दिघे मेढा पोलीस ठाणे




न्युज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post