श्री.सुनिल धनावडे
प्रतिनिधी / सातारा
सातारा : दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या पोटनिवडणुकीत भामघर गावचे सरपंच, ज्यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम केले ते विजय सावले व सह्याद्री नगर चे उदयोजक तुकाराम शिंदे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. ज्यांनी कोरोना कालावधीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचऊन केलेल्या आरोग्यसेवेची पोहोचपावती म्हणून विजय सावले याची निवड झालेचे बोलले जातेय.
दोन वर्षांपूर्वी जावळीच्या राजकारणातील पितामह, जेष्ठ नेते, वसंतराव मानकुमरे भाऊ यांनी सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन बँकेची निवडणूक बिनविरोध केली होती परंतु जावळीची राजधानी मेढा चे सुपुत्र प्रकाश कोकरे व डांगरेघर चे सुपुत्र अरुण सुर्वे याचे आकस्मित निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदासाठी पोट निवडणूक लागली. यामध्ये दोन्ही जागा बिनविरोध करणेत मानकुमरे भाऊंना यश आले
नवनिर्वाचित संचालकांचे निवडीबाबत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान बांधकाम मंत्री, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. जि. प. उपाध्यक्ष मा. वसंतराव मानकुमरे,सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. ज्ञानदेवजी रांजणे, चेअरमन विक्रमजी भिलारे, व्हा. चेअरमन चंद्रकांत दळवी ( आबा ), माजी संचालक पांडुरंग बापू जवळ, समाजसेवक सागर धनावडे,अभय लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आनंदराव सपकाळ, विनोद शिंगटे,तुकाराम तात्या धनावडे. विनोद शिंगटे,बजरंग चौधरी,भाजपा तालुका अध्यक्ष मारुती चिकणे,तुकाराम जुनघरे,सावली सरपंच विजय सपकाळ,गवडी सरपंच राजु खुडे,शामबाबा धनावडे,शांताराम पार्टे, सुरेश दळवी, वागदरे सरपंच वनिता राजेंद्र शेलार, मोहाट सरपंच विलास धनावडे,विकास देशमुख,अनिल सुर्वे युवा नेते चेतन धनावडे, सचिन सावले,दिलीप वांगडे,गणपत ढेबे आदींनी अभिनंदन केले.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली