कराड : श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड संचलित विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कराड, याठिकाणी आ. स्व. पी. डी. पाटील साहेब यांची 108 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, विठामाता विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका, सौ. मुल्ला एस. ए. मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या विठामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, डॉ. सौ. विश्रांती देसाई मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात इयत्ता नववी ब च्या विद्यार्थिनी अनन्या जंगम, श्रुती पवार, श्रावणी पाटील, अर्पिता झिमरे यांनी आ. स्व. पी. डी. पाटील साहेबांच्या जीवनावर आधारित भित्तीपत्रक आणि विठाई अंक तयार केले. त्याचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांनी व अध्यक्षांनी केले. तसेच वैष्णवी सावंत व प्रशिका आंबवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, सौ. मुल्ला मॅडमनी आपल्या मनोगतातून आ. स्व. पी. डी. पाटील साहेबांचा जीवनपट उलगडून सांगितला. शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत शाळेतील गरजू विद्यार्थिनींना गणवेश वाटप व वह्यांचे वितरण करण्यात आले. तसेच जयंतीनिमित्त शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.
यावेळी विठामाता विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा उनउने मॅडम, पर्यवेक्षिका सौ. वैशाली चव्हाण, कार्याध्यक्षा सौ. आत्तार मॅडम, उपकार्याध्यक्षा सौ. उनउने मॅडम यादेखील उपस्थित होत्या. हा कार्यक्रम इयत्ता नववी ब च्या विद्यार्थिनींनी पार पाडला त्यासाठी त्यांना वर्गशिक्षिका सौ दिपाली पाटील यांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार दिपाली वाघ मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली पानस्कर मॅडम यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
कराड / सातारा