जावली तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी संजय कांबळे (पाटील) यांची बिनविरोध निवड


मेढा (जावली) : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गाढवे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुका पोलीस पाटील संघ शाखा जावळी तालुका अध्यक्षपदी सावली गावचे पोलीस पाटील संजय भिकाजी कांबळे (पाटील) यांची आज बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी संतोष नवसरे कोलेवाडी, कार्याध्यक्षपदी नांदगणे पोलीस पाटील विष्णू दळवी, सचिव पदी प्रमोद मानकुंमरे, सहसचिव पदी प्रवीण पवार रुईघर, महिला आघाडी अध्यक्षपदी रेश्मा चव्हाण तेटली यांची एकमताने आज निवड करण्यात आली.


जावली तालुक्यात महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ हा संपूर्ण तालुक्यात कार्यरत असून या संघाचे तालुक्यातील सर्व पोलीस पाटील हे सदस्य आहेत. आज सोमवारी मेढा येथे तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची बैठक पार पडली. या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.

संचालक म्हणून संजय पवार मुकवली ,राजश्री शेलार भोगवली, रवींद्र सुतार निपाणी ,संतोष दळवी मोहाट, अभिजीत भोसले वालुथ, धनंजय माने दरे-खुर्द, सुरेखा जाधव भणंग, ललिता चिकणे गांजे ,अर्चना शिंदे शिंदेवाडी व अनिता लकडे ओझरे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली .

नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच कार्यकारणी सदस्यांचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.



न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली

Post a Comment

Previous Post Next Post