करंदी तर्फ कुडाळ, ता.जावली येथील (सुर्वेवाडी) रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

जावली / प्रतिनिधी 


करंदी : येथील (सुर्वेवाडी) रस्त्याचा मा.खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांचे फंडातून रुपये पाच लाख (5,00,000) निधी आलेला असून त्याचा शुभारंभ मा.सरपंच सौ मंगल का.निकम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग जावलीचे अभियंता कटकेकर साहेब व त्यांचे सहकारी श्री.समाधान सकुंडे व प्रसाद डोंगरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

सुर्वे वाडीच्या रस्त्याची दुरावस्था पाहता (पाऊस काळात) ये जा करताना खूप कसरत करावी लागत होती.याकरिता प्रस्ताव मा.सरपंच सौ मंगल निकम, उपसरपंच बाळासाहेब निकम, सौ मंगल प्र.निकम, संदीप निकम, सौ.वैशाली गुरव , अरुणा निकम, अजित मुसळे, माजी उपसरपंच आनंदराव निकम, सुनील इंगुळकर, शंकर शिर्के ,सुभाष सुर्वे, हनमंत निकम ,पोलीस पाटील श्री.अनिल निकम, वि.का.स.सो-अध्यक्ष कांताराम सुर्वे व त्यांचे सहकारी सर्व संचालक, तसेच नामदेव सुर्वे, शिवाजी पिंपरे ,नामदेव पिंपरे, सचिन निकम, संतोष निकम, शिवाजी निकम (सर ),सहाय्यक कर्मचारी- श्री रवींद्र निकम व आनंद निकम यांचे कडून विशेष प्रयत्न होऊन रस्त्याच्या अडचणीचा मार्ग सुखकर झाल्याचे सुर्वे वाडी ग्रामस्थांकडून समाधान होत आहे.


न्युज मराठी लाईव्ह 
करंदी (कुडाळ) / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post