जावली : तालुक्यातील रानगेघर येथे साऱ्या जगाला मानवता आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची 2569 वी जयंती अगदी उत्साहात संपन्न झाली. यावेळी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन करून ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक उपासक मोहन लक्ष्मण गंगावणे यांच्या हस्ते केले. 


तसेच उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली, त्यामध्ये उपासक गौतम गंगाराम गंगावणे तसेच उपासिका रुपाली आनंद गंगावणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांसमोर बौध्द अनुयायी कसा असावा तसेच त्री सरण पंचशील याचे महत्त्व पटवून देत उपस्थितांची वाहवा मिळवली. 


तदनंतर उपासक राजेश आनंदा गंगावणे यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर सुंदर असे गीत गायले. कार्यक्रमावेळी ग्रामस्थ यांच्यासह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते, यानंतर बुद्ध विहारात समूह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सामूहिक बौद्ध वंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.


न्यूज मराठी लाईव्ह 

जावली / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post