22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा यांच्या वतीने राष्ट्रीय छात्र सैनिकांचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर


सातारा : 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा यांच्या वतीने राष्ट्रीय छात्र सैनिकांचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर सूर्योदय पॉलिटेक्निक कॉलेज महागाव सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे. 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कर्नल राजमन्नार एम ए सेनामेडल आणि अडम ऑफिसर ले कर्नल अनंत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील अनेक कॉलेज चे मुले मुली प्रशिक्षण घेत आहेत.


सूर्योदय कॉलेज परिसराला लष्करी छावनी चे स्वरूप आले असून भारतीय सैन्य दलातील अनेक अधिकारी व जवान यांच्यामार्फत छत्रांना प्रशिक्षण दिले जात आहे. सकाळी पिटी परेड, रायफल प्रशिक्षण, आंबूस, म्यॅप रिडींग, जजिंग डिस्टन्स, याच सोबत सैन्य इतिहास,तज्ञ् मार्गदर्शकांची व्याखाने, व्यक्तिमत्व विकास, शिस्त, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा घेऊन छात्र सैनिकांना प्रेरित केले जाते.

निसर्गरम्य वातावरणात सुरु असलेल्या यादहा दिवसाचे शिबिरास यशस्वी करण्यासाठी सुभेदार मेजर तानाजी भिसे, सुभेदार संभाजी शिंदे, दादा आरागडे यासह भारतीय सैन्य दलातील अनेक अधिकारी परिश्रम घेत आहेत. कॅप्टन डॉक्टर समीर पवार यासह अनेक एन सी सी अधिकारी या शिबिरात सहभागी आहेत. या शिबिराचे उदघाटन कर्नल राजमन्नार एम. ए. सेनामेडल यांनी केले.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने