पर्यावरण पूरक उपक्रमात सातारकरांना सहभागी होण्याचे आवाहन -प्रशांत पोतदार

श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड (सातारा) 


सातारा: साताऱ्याचे तापमान कधी नागपूर एवढे असायचे का? साताऱ्यात आता ४० तापमान येऊ घातले आहे. साताराचे सोडा आता पाचगणी / महाबळेश्वर मधे सुद्दा एअर कंडिशनर बसवावे लागत आहेत. या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापामानाला अनेक कारणे आहेत आणि त्यावर अनेक उपाययोजनाही चालू आहेत.


त्यामुळे जास्तीजास्त वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करणे हा एक सर्वोत्तम उपायांपैकी एक पर्याय आहे. आपल्या साताऱ्यातील काही वृक्षप्रेमी एकत्र आलेत आणि त्यांनी "हरित सातारा " या बॅनर खाली एक फार मोठे काम सुरू केले आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाताना खालच्य मंगळाई मंदिराजवळील चार भिंती टेकडीवर या वृक्षप्रेमी समूहाने जवळजवळ १५०० विविध प्रकाराचे वृक्ष लावले आहेत. 

या वृक्षांचे व्यवस्थित संगोपन व्हावे यासाठी तिथे ५००० लिटर पाणी मावेल एवढी एक पाण्याची टाकी सुद्दा बांधण्यात आली आहे. ही टाकी बांधण्यासाठी साताऱ्यातील सुप्रसिद्ध राजपुरोहित स्वीट्स, चंदूकाका सराफ व कुणबी समाज संघ यांनी सहकार्य केले आहे. हरित सातारचे काही सक्रिय निसर्गप्रेमी दररोज सकाळी आणि संध्याकाळी या टेकडीवर जाऊन तेथील झाडांना पाणी घालत असतात. त्यामुळे भर उन्हाळ्यात सुद्धा या टेकडीवर आता सहा ते सात फुटापर्यंत वाढलेली हिरवीगार झाडे दिसू लागली आहेत. 

हरित साताराच्या या निसर्ग संवर्धनाच्या कामात सहभागी होण्यासाठी साताऱ्यातील शाळा कॉलेज मधील विद्यार्थी, एम.आय.डी.सी मधील काही फॅक्टरीज मधील अधिकारी कर्मचारी येत असतात सातारा एम.आय.डी.सी. क्रेन या कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यानी या टेकडीवर येऊन दोन तास श्रमदान केले आहे. तसेच साताऱ्यासह सर्व जिल्ह्यातील निसर्गप्रेमी आणि एमआयडीसीतील सर्व कारखानदारांनी मोठमोठे उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून आपला हर जिल्हा करण्याचे काम करावे. असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोद्दार यांनी केले आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post