श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)
मेढा (जावली) : शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ आयोजित शिवप्रेमी मित्र समूह पिंपरी, नवजवान तरुण मंडळ पिंपरी, ग्रामस्थ मंडळ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पार पडला. या शिवजयंती उत्सवामध्ये किल्ले प्रतापगड वरून शिवज्योत आणण्यात आली शिवज्योतीचे गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सत्यनारायणाचा प्रसाद करण्यात आला होता रात्री महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये श्री.आनंद पवार यांच्यातर्फे महिलांना भेटवस्तू देण्यात आली.
श्रीकृष्ण डेंटल सेंटर मेढा डॉ.वैभव भुजबळ यांच्यातर्फे छावा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. कौस्तुभ पेट्रोलियम चे मालक बापू वांगडे यांचे तर्फे शिवप्रसाद देण्यात आला होता. दि.१८ मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान भरवण्यात आले यामध्ये मानाची गदा पिंपरी चा पैलवान सुरज वांगडे याने पटकावली तर प्रथम कुस्तीचा मान पैलवान आकाश वेताळ यांनी घेतला या आखाड्यात अविस्मरणीय कुस्तीचे प्रदर्शन करण्यात आले.
वस्ताद राहुल मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टर वरच्या अनेक कुस्त्या जोडण्यात आल्या होत्या. पिंपरी ग्रामस्थांनी कुस्त्यांसाठी वेगवेगळी बक्षिसे दिली होती. पिंपरी गावचे सुपुत्र संदीप वांगडे पीएसआय यांच्यातर्फे मानाची गदा देण्यात आली होती तर प्रथम क्रमांकाची कुस्ती लक्ष्मी चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विनोद दादा पार्टे यांचे तर्फे देण्यात आली.
कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेले कृषिप्रधान पिंपरी गावात या मातीतून अनेक पैलवान घडले आत्ताचा तरुण वर्ग कुस्ती पासून वंचित राहू नये हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पिंपरी गावातील तरुणांनी गेली तीन वर्षे जंगी मैदान भरवण्याचे धाडस केले आहे आणि
पुढे देखील दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने मैदान घेतले जाईल अशी ग्वाही शिवप्रेमी मित्र समूह सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे देण्यात आली.भैरवनाथ तालीम संघ मेढा, जय हनुमान तालीम संघ पिंपरी यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य राहीले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment