श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड (सातारा)
कराड : स्वच्छ गाव सुंदर गाव हे आपल्या वैयक्तिक व सामूहिक जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छतेत लोकसहभागाचा वाटा महत्त्वाचा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी "स्वच्छ गाव सुंदर गाव ही सेवा" ही संकल्पना वरदान ठरणार असून त्यासाठी सांघिक प्रयत्न आणि पक्का निर्धार कारणे गरजेचे आहे. स्वच्छता हीच ईश्वर सेवा मानून स्वच्छ गाव सुंदर गावाची ओळख नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे. असे आवाहन मुख्यमंत्री, लाडकी बहीण शासकीय योजनेच्या अध्यक्षा दीपाली ताई खोत यांनी पाडळी हेळ येथे स्वच्छ गाव सुंदर गाव या कार्यक्रमात केले.
दीपाताई खोत पुढे म्हणाल्या, स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून गावातील महिलांनी निर्धार करत एकत्र येऊन घरातील ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे दोन वेगळे डबे करून गावातील ग्रामपंचायत घंटागाडी मध्ये जमा करावे. तसेच यापुढे गावातील महिलांनी घरात व गावात आरोग्याला धोका होईल असा कचरा गोळा करून न ठेवता, ओला कचरा,आणि सुका कचरा घंटा गाडीमध्ये टाकून आपले घर आणि गाव स्वच्छ ठेवावे असे त्यानी गावातील उपस्थित महिलांना सांगितले.
या कार्यक्रमाला ग्रामसेवक सावंत अण्णासाहेब, गावचे युवा पुरंदर जाधव, ह भ प जगन्नाथ जाधव, प्रभाग संघपाधिकारी शैला चव्हाण, ग्राम संघ अध्यक्ष सुवर्णा शिंदे,विद्या जाधव, शारदा जाधव, शांताबाई जाधव, बचत गट प्रेरिका ज्योती ठोंबरे, ग्रामपंचायत माजी सरपंच मंजुषा भोज, इस्कॉन सेविका सविता शिंदे,पल्लवी जाधव, शोभा जाधव, सविता जाधव,कामनी जाधव, उषा जाधव,आशा जाधव, सीमाताई जाधव,सुषमा गुरव बहुसंख्येने उपस्थित होत्या.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कराड


टिप्पणी पोस्ट करा