महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सविता सपकाळ व खंडाळा तालुका अध्यक्षपदी बबलू वाघमारे यांची निवड
खंडाळा : तालुक्याच्या नवनियुक्त कार्यकारणी साठी सर्किट हाऊस लोणंद या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वतीने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष किरण बगाडे म्हणाले की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा स्वाभिमानी पक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या पक्षाचे जाळे व कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत सातारा जिल्ह्यामध्ये नवनियुक्त खंडाळा तालुक्याची कार्यकारणीसाठी किरण बगाडे उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या पक्षाची निर्मिती केली आहे पक्षाचे संस्थापक आयु संजय भैय्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू आहे सोनवणे पक्षाच्या ध्येय आणि धोरणानुसार प्रत्येक कार्यकर्ता घडला पाहिजे व तो मोठा झाला पाहिजे आज अखेर फक्त नेत्यांनी कार्यकर्त्यांचे वाटोळे केले व स्वतः मोठे झाले आंदोलन, मोर्चे करून तांत्रिक दबाव तंत्र ठेवून स्वतःचा फायदा करून कार्यकर्त्यांना फक्त झेंडे वागवण्याचेच काम दिले महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा झोपडपट्टीतला नसून हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे.
या पक्षाच्या माध्यमातून शोषित पीडित यांना न्याय देण्याचे काम केले जाते लवकरच खंडाळा तालुक्याचे संपूर्ण कार्यकारणी जाहीर करणार असून येणाऱ्या काळामध्ये भव्य अशा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन खंडाळा या ठिकाणी करणार असल्याचे बबलू वाघमारे यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष आयु.किरण बगाडे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी सविता सपकाळ यांची निवड तसेच बबलू वाघमारे यांची खंडाळा तालुका अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी अरुण कोळेकर अर्चना शिंदे संघटक अनिता शेलार महिला आघाडी खंडाळा तालुकाध्यक्ष बेबी क्षीरसागर महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष निवड करण्यात आली.
यावेळी अनेक पदाधिकारी यांचं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षांमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर वेगवेगळ्या पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे यावेळी या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष किरण बगाडे युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते सातारा जिल्हा संघटक विकास जाधव जावली तालुका उपाध्यक्ष सयाजी भिसे लक्ष्मण खुडे राहुल माने सातारा युवक उपाध्यक्ष वप्रतिभा जाधव लता खुंटे चैताली खुंटे इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अरुण कोळेकर यांनी आभार मानले.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खंडाळा (सातारा)



Post a Comment