बातमी : श्री.आनंद गंगावणे
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला सातारा जिल्हा म्हणून सर्वत्र सुपरीत आहे त्याचबरोबर देशी खेळांसाठीही आपला सातारा जिल्हा प्रसिद्ध आहे विविध प्रकारचे पारंपारिक खेळ आपल्याकडे खेळताना अजूनही आपली पिढी दिसून येते . सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आपल्या अलौकिक कामगिरीने देशपातळीवर नाव कमावले असून, नुकतीच एनसीईआरटीच्या पथकाने साताऱ्यातील खंडाळा आणि जावली तालुक्यातील विविध शाळांची पाहणी केली.
एनसीईआरटीच्या पथकाने खंडाळा तालुक्यातील पाडळी, निंबोडी ,कोपर्डे, वाघोशी आणि जावली तालुक्यातील बेलोशी, आंबेघर तर्फ मेढा आणि एकीव या शाळांना भेटी दिल्या .विशेषतः या पथकाला खेळ व खेळाचे शालेय अभ्यासक्रमातील एकात्मीकरण याबाबत सविस्तर जाणून घ्यायचे होते. पारंपरिक खेळ, त्यांचे कौतुकाधिक उपक्रमांनी नटलेल्या उपक्रमशील शाळा पाहून एनसीआरटीतील सर्व अधिकारी आनंदित झाले त्यांनी विविध देशी खेळांचा आनंद लुटला.
या अभ्यास दौऱ्यामध्ये डॉ. विशाल पाजनकर,प्रा. ज्योती बावणे, नंदिनी मॅडम, नंदुरबारचे अधिव्याख्याता विनोद लावंडे हे सहभागी झाले होते.
दुर्गम, डोंगराळ; शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी रस्सीखेच लंगडी विटी दांडू चल्लस आठ ,लेझीम, सूर पारंब्या, आई माझे पत्र हरवलं, फुगड्या , झिम्मा, काचपुरणी, टायर फिरविणे, चकरी, चक्र फिरविणे अशा ग्रामीण खेळांचे अप्रतिम सादरीकरण केले . तसेच मुलांनी पोवाडा गायन केले. हे सर्व पाहून सर्व जण भारावले.
जावळीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तार अधिकारी संजीवनी मुळे, खंडाळ्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, साताऱ्याचे अधिव्याख्याता कृष्णा फडतरे, केंद्रप्रमुख राजेंद्र कुंभार, केंद्रप्रमुख मिलन मुळे, केंद्रप्रमुख शंकर बिरामणे , अंजली गोडसे, वर्षा ससाणे, मुख्याध्यापक प्रकाश धनावडे , मुख्याध्यापक राजश्री शिंदे, मुख्याध्यापक सुनिल धनावडे क्रीडा समन्वयक सत्यवान माळी, पाडळी शाळेचे मुख्याध्यापक धायगुडे सर कोपर्डे शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कदम निंबोळी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर वाघोशी शाळेचे क्रीडाशिक्षक दत्तात्रय धायगुडे सर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व शाळांच्या पालक व ग्रामस्थांनी खूप परिश्रम घेतले. देशी खेळांचे जतन यासाठी ही शासन प्रयत्नशील असून, यातून ग्रामीण भागातील खेळांचे अवलोकन पथक करत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा





Post a Comment