बातमी : श्री.आनंद गंगावणे
भोपाळ, मध्य प्रदेश येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पाच दिवसीय बहुभाषिक चर्चासत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आल्याचे दृश्य.
राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांमध्ये प्रभावी सादरीकरण- महाराष्ट्र टिमने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सातारा : दि. ९ फेब्रुवारी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राष्ट्रीय स्तरावरील पाच दिवसीय बहुभाषिक चर्चासत्रात महाराष्ट्रातील शिक्षकांनी प्रतिनिधित्व केले. राष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात प्रत्येक प्रदेशाची स्वतःची प्रादेशिक भाषा असते. आपल्या महाराष्ट्रात जशी मराठी भाषा बोलली जाते, तशीच प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा आपल्या प्रदेशात बोलली जाते. तर मुलांचे प्राथमिक शिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ते मातृभाषेतूनच झाले पाहिजे, यासाठी देशातील विविध राज्यांतून भोपाळ (मध्य प्रदेश) येथे पाच दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यात कच्छ येथील दोन शिक्षक महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रतिनिधित्व केले होते . मराठी भाषा आणि त्याच्या विविध बोलीभाषा देवनागरी लिपीत आणि जगभर लिहिता येतात.
प्राथमिक शिक्षण घेत असताना मुले सहसा आपल्या मातृभाषेत बोलत असतात आपल्या मराठी भाषेत विविध बोलीभाषा असल्याने मुलांची भाषा समजून घेऊन त्यांना शिक्षण द्यावे लागते .विविध भाषेतील मुले एकत्र एका वर्गात शिक्षण घेत असताना शिक्षकांना त्यांना शिकवणे ही मोठे जिकरीचे असते .या सर्वांसाठीच बहुभाषिक शिक्षण ही काळाची गरज आहे .हे ओळखून महाराष्ट्रातील शिक्षकांनी आपल्या मराठी भाषा आणि त्यातील विविध बोलीभाषा प्रतिनिधित्व या प्रशिक्षणात केले .यामध्ये सातारा जिल्ह्यातील अंजली गोडसे मॅडम यांनी आपल्या सातारा जिल्ह्याची प्रतिनिधीत्व केले.
पाच दिवसांच्या शिबिरात विविध तज्ज्ञांकडून स्थानिक भाषेबरोबरच मूलभूत शिक्षण कसे द्यावे! उदाहरणार्थ, समज आणि प्रशिक्षण एका विशिष्ट पद्धतीने दिले गेले, ज्यामध्ये डॉ. चित्रा सिंग , डॉ. महेंद्र मिश्रा, डॉ. ज्योती चंदेल, डॉ. राघवजी मधड, डॉ. रुची मिश्रा, डॉ. जगदीप सोनवणे, डॉ. गंगा मेहतो, डॉ. निलेश चंपानारी आदींनी अतिशय अचूक मार्गदर्शन केले .या प्रशिक्षणाचे अध्यक्ष सुरेश मकवाना यांनी मार्गदर्शनासह संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
न्युज मराठी लाईव्ह
सातारा

Post a Comment