प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे
कराड (सातारा) : गुरुवार दी.६/२/२०२५ रोजी भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कराड तालुक्यातील इंदोली गावचे सुपुत्र हवालदार लक्ष्मण रावते यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह, ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य प्रशांत कदम यांनी सन्मानीत केले.
बोनस आयुष्य सैनिकांच्या व समाजाच्या सोडवण्यास अर्पित करावे या प्रसंगी बोलताना प्रशांत कदम म्हणाले की सैनिक हा कधी रिटायर होत नाही. तो सैन्या मधून रिटायर झाला असला तरी तो समाजामध्ये काम करत असतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सैनिकाला अनेक संघर्ष करावे लागतात सैनिकाने आपले असणारे बोनस आयुष्य समाजामध्ये नवीन युवा पिढी ला मार्गदर्शन करून सैन्य सेवेत भरती होण्यासाठी भारत मातेची सेवा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. व शोषित, वंचित समाजाला मदत करावी तसेच सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सक्षम करण्यासाठी त्यांनी योगदान द्यावे व सैनिक फेडरेशन बरोबर काम करावे.
सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा
सातारा जिल्हा हा सैनिकांचा शूरवीरांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आजी / माजी सैनिक , शहीद जवान कुटुंबीय हे सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर निरनायक भूमिकेत आहेत. सरकार दरबारी अनेक आजी / माजी सैनिक व शहीद जवान कुटुंबियांच्या अडचणी प्रलंबित आहेत त्यांना न्याय मिळत नाही या सर्व समस्या साठी सर्व सैनिकांनी सैनिकांच्या हक्कासाठी एकत्र आले पाहिजे संघटित रहावे ही काळाची गरज आहे शासनाकडून माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना व शहीद जवान कुटुंबियांना मिळणाऱ्या सुविधा या त्यांच्या कुटुंबापर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत असे त्यांनी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी कराड तालुका अध्यक्ष सदाशिव नागने, सैनिक सहकारी बँकेचे संचालक पतंगराव जाधव, इंदोली माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री रावते साहेब, श्री वसंतराव कदम, श्री प्रल्हाद यादव, अशोक जाधव सर्व माजी सैनिक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment