कृष्णा नदी चळवळ लढ्याचे एक तप पूर्ण झाले असून हा लढा गुरुवर्य 'राजेंद्र केरकर'आणि कृष्णेच्या शिलेदारांना समर्पित ; राहुल पवार


कराड (सातारा) : नदी प्रदूषण अन्नसाखळी निसर्ग साखळी वाचवण्यासाठी कृष्णा नदी चळवळीची स्थापना 2013 साली कराडमध्ये झाली होती. या नदी बचाव चळवळीसाठी सामाजिक दृष्टिकोन ठेऊन तरुण युवकांनी मोठया प्रमाणात सहभाग पुढाकार घेतला होता.यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून गोव्याचे पर्यावरण, अभ्यासक राजेंद्र केरकर,यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा 'नदी' चळवळीचा लढा सुरू करण्यात आला होता.

गेली बारा वर्षे कराड तालुका परिसरात व महाराष्ट्रातील सातारा सांगली जिल्ह्यात प्रबोधन, कार्यक्रम घेण्यात आले आहेत.आजपर्यंत नदी, चळवळीसाठी गणेशोत्सव काळात कृत्रिम तलाव,नदी प्रदूषण, नदी संवाद, चर्चासत्राच्या अनुषंगाने कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये प्रबोधन, करण्यात आले आहे कृष्णामाईच्या प्रवाह अखंडपणे चालू राहावा कृष्णा नदीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा लोक चळवळ निर्माण व्हावी यासाठी लवकरच कृष्णेचे अंतरंग पुस्तक व कृष्णामाईच्या बारा वर्षाच्या लढ्याचा स्मरणिका प्रकाशित होत आहे.

यासाठी विद्यार्थ्यांनी आम्हाला सहकार्य करावे असे आव्हान आबासाहेब चव्हाण यांनी केले यावेळी गोव्याच्या मांडवी नदीच्या लढा संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली गोव्याच्या लेखिका शुभदा चारी यांचं मांडवीच अंतरंग हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले.कराड तालुक्यातील ज्योतिर्लिंग विद्यालय कवठे, महात्मा गांधी विद्यालय वडगाव हवेली, निळेश्वर माध्यमिक विद्यालय वडोली निळेश्वर, कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूल ओगलेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल करवडी, लाहोटी कन्या शाळा कराड, श्री संत तुकाराम विद्यालय कराड, आत्माराम विद्यालय सदाशिवगड, विद्याप्रबोधिनी कराड,यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड,वेणूताई चव्हाण कॉलेज कराड, मोकाशी कृषी विद्यालय राजमाची कराड, तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रबोधन करण्यात आले आहे.

तसेच या चळवळीला बारा वर्ष पूर्ण झाली आहेत.यासाठी कृष्णा बचाव चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी स्नेह मेळावा विद्या प्रबोधिनी कराड येथे घेण्यात आला यावेळी आबासाहेब चव्हाण, अशोक सुतार, विजय जगताप,प्राजक्ता जगताप,राहुल पवार,नीता देशमुख,दीपक मोप्रेकर, माधुरी पवार, संजय साठे,जमीर पटेल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक मनोगत राहुल पवार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदेव वाघमारे आभार अशोक सुतार यांनी मानले यावेळी प्राध्यापक जमीर पटेल अनेक मान्यवर संजय पवार यांनी मनोगत व्यक्त केलेतसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post