श्री.महेश यादव
प्रतिनिधी / औंध (सातारा)
औंध (सातारा) : राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत भंडारे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी विभागातील सहयोगी प्रा. डॉ .हणमंत पोळ होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती आहे. या वर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा आनंद द्विगुणित झाला आहे कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर हा दर्जा आपल्या मराठी भाषेला दिला आहे.
भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे .जगात ८३ दशलक्ष पेक्षा अधिक लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेतही सुमारे ४० हून अधिक बोली भाषांचा समावेश आहे. मराठी भाषेच्या सुलभी करणासाठी व मराठी भाषा शिकण्यासाठी चे अडथळे दूर करण्याची गरज आहे.
मराठी भाषा वृद्धिंगत होण्यासाठी भाषेतील बोजडपणा कमी करण्याचा प्रयत्न व्हावा. अध्यक्षीय भाषणात डॉ.श्रीकांत भंडारे म्हणाले की मराठी भाषेचा विकास व संवर्धन होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस भाषेमध्ये बदल होत आहे .मराठी भाषा समृद्ध होऊन समाजातील तळागाळापर्यंत मराठी भाषेचे ज्ञान देण्याचा प्रयत्न व्हावा.
मराठी भाषेच्या समृद्धीसाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळा महाविद्यालयातून आयोजित केले तर भाषेचा विकास होऊ शकतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. अजित देसाई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीशैल कोरे यांनी केले .कार्यक्रमाचे आभार डॉ.सुखदेव भोसले यांनी मानले. जन कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / औंध (सातारा)

Post a Comment