महाशिवरात्रीनिमित्त कराड ब्रह्मकुमारी संस्थेचे कमळेश्वर मंदिरांमध्ये चित्र प्रदर्शन

श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड (सातारा)


कराड : येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने श्री कमळेश्वर मंदिर मंगळवार पेठ येथे श्री कमळेश्वर दर्शन, शिव अभिषेक, अनंत शिवलिंग दर्शन, चित्र प्रदर्शन, ठेऊन शिवभक्तांसाठी आकर्षण ठरलेला महोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी आकर्षण ठरलेल्या चित्रप्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय ह. भ. प. महाराज श्री संजय आडुल बुवा पाटण, व श्री कमळेश्वर देव ट्रस्टचे ट्रस्टी श्री वैभव अनगळ, तसेच ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मचारी उषा दीदी यांच्या हस्ते करण्यात आले.

ब्रह्मकुमारी उषा दीदी पुढे म्हणाल्या, ही रात्र अंधकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानली जाते, या रात्री शिव परमात्म्याचे ध्यान करून अंधकारातून प्रकाशाच्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर जाता येते, व परमपिता शिव परमात्म्याशी ध्यान लावल्यानंतर जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतात, अशी सर्व मान्यता आहे. असे त्या बोलत होत्या.

सायंकाळी दीप रॅलीचे उद्घाटन आर. टी. ओ. अधिकारी सौ. शीतल जाधव, ब्रह्मकुमारी संस्थेच्या संचालिका उषा दीदी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला ब्रह्मकुमार ,गणेश भाई, विकास भाई, ब्रह्मकुमारी लता दीदी व आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post