पाटाचे पाणी पाजण्याच्या कारणावरून रागाच्या भरात चुलत्याकडून पुतण्याचा खून प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी

श्री.लालासाहेब माने (पाटील)
प्रतिनिधी / वडूज (सातारा) 


वडूज (सातारा) : आरोपी पांडुरंग बाळकू यमगर वय - 76 वर्ष (मयताचे चुलते ) रा. म्हासूर्णे ता.खटाव जि.सातारा मयत राजेंद्र सिताराम यमगर वय - 32 वर्ष दि.08/05/2014 रोजी 13:30 वाजता भवानी माता मंदिराजवळ यमगर वस्ती रा. म्हासूर्णे ता.खटाव जि.सातारा उरमोडी पाटाचे तात्पुरत्या सोडलेल्या पाटाचे पाणी त्याचे जमीनीचे बाजूने जाणारे चर मधून वाहत असताना ते आरोपीचे शेताकडे जात असताना यातील मयत राजेंद्र सिताराम यमगर याने अडवून चर खोदून आपले पिकाकडे वळवले याचा राग मनात धरून मयत हा खाली वाकून पाणी वळवत असताना बेसावध असताना यातील आरोपी याने आपले हातातील खोरे घेऊन येऊन तू माझ्या शेताकडे जाणारे पाणी का अडवतोस असे म्हणून त्याचे डोक्यात खोरे उलटे धरून खोऱ्याचा तुंबा जोरात मारला व खोरे घेऊन तो बडबड करीत स्वतःचे वस्तीकडे निघून गेला यातील मयत राजेंद्र सिताराम यमगर यास डोकित जबर मार लागून त्याचे कवटीचे हाड तुटून मेंदूस गंभीर दुखापत झाली त्यानंतर मयत यांचा उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सदर गुन्ह्यात श्री.एस.जी.दळवी पो.उप.नि वडूज पो.स्टे. यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध मा.जिल्हा सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील श्री. वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले.

साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीशसो श्री.आर.व्ही.हुद्दार यांनी आरोपीला सदोष मनुष्यवध भा.द.वि.स कलम 304(1) अन्वये दोषी ठरवून आज दि.28/02/2025 रोजी आरोपी - पांडुरंग बाळकू यमगर (मयताचे चुलते) रा. म्हासूर्णे ता.खटाव जि.सातारा यास भा.द.वि.स कलम 304 (1) अन्वये 10 वर्ष सक्तमजुरी व 5000 रू दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद सदर खटला चालवणे कामी सरकारी वकील श्री. वैभव काटकर , पो.नि. मा.श्री. घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पो.उप. नि.दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. 2086 विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ.585 सागर सजगणे, पो.कॉ. 2414 जयवंत शिंदे, पो. कॉ. 292 अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / वडूज (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post