डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची साताऱ्यात शनिवारी कार्यशाळा

श्री.बजरंग चौधरी 
प्रतिनिधी / जावली (सातारा) 


सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा साताराच्या वतीने मान्यवरांचा मानसन्मान व जिल्ह्यातील संपादक पत्रकार बंधू-भगिनींसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार, दि. १ मार्च रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात आयोजित केले आहे. 

यावेळी सातारा जिल्ह्यातील नवनियुक्त मंत्रिमहोदय यांचा सन्मान करण्यात येणार आहे व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष, माध्यमतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार राजा माने साहेब यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात येणार आहेत. 

संपादक पत्रकार कार्यशाळेचे अध्यक्षस्थान माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब मंत्री पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री सातारा हे भूषवणार आहेत. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामीण विकासमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार श्री मकरंद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. 

या कार्यक्रमासाठी श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा, श्रीमती याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, श्री. समीर शेख जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा श्री सतीश सावंत राज्य उपाध्यक्ष, डिजिटल मीडिया पत्रकार संघटना विकास भोसले अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, तेजस राऊत राज्य समन्वयक, श्री. महेश कुगावकर राज्य सचिव, श्री गणेश बोतालजी राज्य सहसमन्वयक श्री संजय कदम राज्य अध्यक्ष साप्ताहिक संघटना, श्री सचिन भिलारे राज्य कार्यकारिणी सदस्य हे उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील संपादक पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. संतोष शिराळे, सातारा शहराध्यक्ष श्री. अजित सोनवणे उपाध्यक्ष संदिप माने यांनी केले आहे.



न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / जावली (सातारा) 

Post a Comment

Previous Post Next Post