श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)
मेढा (जावली) : दि.८ मार्च महिला दिनानिमित्त मेढा येथे भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रथमच भारतीय जनता पार्टी मेढा शहर यांच्या वतीने महिलांचा सन्मानआणि आगळा- वेगळा सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले (महाराज साहेब)उपस्थित राहणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त मेढा येथील सर्व सन्माननीय माता-भगिनींचा सन्मान तसेच आकर्षक भेटवस्तू देऊन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब हे करणार आहेत.
मेढा येथील कलश मंगल कार्यालय एसटी डेपो समोर दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.यामध्ये तीन वाजता होम मिनिस्टर पैठणी आणि विविध खेळ स्पर्धा होनार आहेत. मेढा नगरीतील महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात विविध प्रकारची बक्षीस ठेवण्यात आली आहेत. आणि खास आकर्षण म्हणजे झी मराठी फेम (पारू) अभिनेत्री शरया सोनवणे ही अभिनेत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहनार आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली. हा कार्यक्रम मेढा नगरीतील महिलांसाठी आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी मेढा नगरीतील सर्व महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बीजेपी मेढा शहर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / मेढा (जावली)


Post a Comment