श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड
कराड (सातारा) : मसूर येथील महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या गेली तीन दिवसापासून निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा,व रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांमध्ये स्थानिक भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला ही,आनंदाची गोष्ट आहे. खरे तर महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक शिव परमात्मा भगवाणाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा हा एक हिंदू सण आहे.
शिवजींच्या विषयावर निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व भाषण स्पर्धा असो पण या उपक्रमाच्या माध्यमातून शिव परमात्म्याचा परिचय आणि हिंदू सणाला बळकटी मिळत आहे, यापेक्षा दुसरी कोणती मोठी गोष्ट असू शकत नाही. या पुढच्या काळामध्ये ब्रह्मकुमारी संस्थेने हिंदू धर्म संस्कृतीला उजाळा देण्याचे काम तळागाळात जाऊन करावे व आमची त्यांना सदैव साथ राहील असे प्रतिपादन किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले.
मसूर (तालुका)कराड प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या महाशिवरात्रीनिमित्त स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते. तसेच मसूर उपसेवा केंद्राचे प्रमुख संतोष भाई,संचालिका शैलजा दीदी यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक त्यांनी केले. यावेळी आदी मान्यवर मुख्यमंत्री लाडकी बहीण शासकीय योजनेच्या अध्यक्षा दिपालीताई खोत उपस्थित होत्या.
रामकृष्ण वेताळ पुढे म्हणाले, आज समाजात विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण-तरुणी प्रौढ जेष्ठ व्यक्ती खूप ताण तणावात आहेत. जीवन जगत असताना अनेक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिस्थितीशी सामना करत असताना आपले मनोबल वाढले पाहिजे मन शांत संयमी स्थिर ठेऊन योग्य निर्णय घेऊन पुढे गेले पाहिजे. त्यासाठी लागणारे मानसिक बळ ब्रह्मकुमारी संस्था देत आहे. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा.
दिपाली ताई खोत म्हणाल्या ब्रह्मकुमारी संस्था ही देशांमध्ये दुसऱ्या नंबरची आध्यात्मिक संस्था आहे. या संस्थेच्या अध्यात्मिक कार्याचे कौतुक स्वतः देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आवर्जून केले आहे. तसेच या संस्थेने बऱ्याच व्यसनी लोकांना व्यसनापासून व ताण तणावा पासून मुक्त केले आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारी ही संस्था पुढे फार मोठे कार्य करणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रह्मकुमारी शैलजा दीदी यांनी महाशिवरात्रीचे रहस्य सांगून मान्यवरांचे स्वागत केले.ब्रह्मकुमारी मनीषा दीदी यांनी सूत्रसंचालन केले, राजयोगी ब्रह्मकुमार संतोष भाई यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच तलाठी लता दीदी डॉक्टर अंजली कुराडे सर्व ब्रह्मकुमार कुमारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कराड (सातारा)


Post a Comment