समाजभूषण पुरस्कार मिळाल्याचा सन्मान व सत्कार सोहळा

प्रतिनिधी : मेहमूद्दीन शेख 


रहिमतपूर (सातारा) : हिंद नगर वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे विविध पदावर नियुक्त झालेल्या यांचा व पत्रकार संघटनेतर्फे सय्यद सर व जगदीश गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार व या यशात हिंद नगर वाचनालय व ग्रंथालय रहिमतपूर यांचा सिंहाचा वाटा ऐतिहासिक रहिमतपूर नगरीत लावलेले वाचनालय चे रोपटे वटवृक्ष झाले श्री.मा.मुख्याध्यापक पीपी माने सर यांचे प्रतिपादन. 

या हिंद नगर वाचनालयाची स्थापना 1952 साली डॉ अण्णा देशपांडे यांनी आपल्या राहत्या घरात सुरू केली गावातील बेरोजगारी संपावी गुणवान कर्तृत्वान मुलं घडावी ही संकल्पना उराशी बाळगून अण्णांनी व संयोजकांनी ती वाढवली व जोपासली अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडविले आजच्या या सत्कार सोहळ्यात कु मयुरी सुनील भोसले व निकिता विकास ढोणकर यांची आयडीबीआय मध्ये कार्यकारी अधिकारी व शुभम राजाराम भिसे व कु राजेंद्र पवन हत्ते यांची मुंबई पोलीस मध्ये नियुक्ती झाली याबद्दल प्रमुख पाहुणे मा पीपी माने सर मुख्याध्यापक वसंत दादा पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज रहिमतपूर यांच्या हस्ते व नगराध्यक्ष आनंदा कोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने (भैय्या) व मान्यवर यांच्या उपस्थितीत व घरातील पालकांच्या बरोबर त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले गाव हे मोठं असतं त्या गावातील गुणवान व चांगली माणसे राहतात यावरून गावाचे मोठेपण कळते मुले चांगली घडावी या उद्देशातून स्पर्धा परीक्षा व एमपीएससीच्या परीक्षा देऊन ही मुले चांगल्या हुद्द्यावर जाऊन रहिमतपूर चे नाव व आई वडिलांचे नाव उज्वल करावे हे माझे स्वप्न आहे मा नगराध्यक्ष आनंदा कोरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले यशस्वी विद्यार्थ्यांची कौतुकाची थाप टाकावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला नगरसेवक बेदिल माने यांनी आभार मानले या कार्यक्रमाला सह्याद्री कारखाना संचालक अविनाश माने (तात्या )व पोलीस पाटील दीपक नाईक साहेब व विविध मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / रहिमतपूर (सातारा)

Post a Comment

Previous Post Next Post