प्रतिनिधी : श्री.अनिल मोरे
कराड : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी दिली. डॉ. नीलम मिश्रा यांची सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कृष्णा विद्यापीठाने कुलगुरू निवडीसाठी रीतसर शोध समिती गठीत केली होती व नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेस चे कुलगुरू डॉ. दीपक टेम्पो यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी सदस्य प्रा. ई. सुरेश कुमार आणि वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षक आणि संशोधन संस्थेचे कुलगुरू डॉ.ललितभूषण वाघमारे यांचा समावेश होता. या शोध समितीने 3 नावे निश्चित करून ती कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे सोपवली होती. त्यातून कुलपती डॉ.भोसले यांनी डॉ.नीलम मिश्रा यांच्या नावाची निवड करत, त्यांची कुलगुरूपदी फेरनियुक्ती केली. तर 28 जानेवारीला त्यांना नियुक्तीचा आदेश देण्यात आला.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कराड (सातारा)

Post a Comment