मेढा ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या छबिण्यात भक्तांची मांदियाळी

प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे 


आज यात्रेच्या मुख्य दिनी अनेक भाविक भक्तांनी घेतले भैरवनाथाचे दर्शन

मेढा (जावली) : आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी मेढा ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या निमित्त सर्व भाविक भक्तांनी श्री भैरवनाथाचे दर्शन घेतले, यात्रेच्या मुख्य दिवशी श्री भैरवनाथ देवाचे दर्शन घेण्यासाठी उदरनिर्वाहासाठी मुंबई पुणे या ठिकाणी गेलेले भक्त यात्रेच्या निमित्ताने मेढा येथे उपस्थित असतात.

ग्रामदैवत चोरंबे श्री पद्मावती देवीची पालखी छबिन्याच्या दिवशी भैरवनाथाच्या भेटीला येत असते, या भेटीनंतर छबिण्याला सुरुवात होते, भैरवनाथाचे मूळ स्थान असलेले मंदिर येथे आरती संपन्न होते आरती झाल्यावर सर्व महिलावर्ग धूप कापूर लावत असून दोन्ही पालखीचे प्रस्थान मंदिराच्या दिशेने होत असते, यात्रेच्या दिवशी सकाळी भैरवनाथ मूळ स्थानापासून ते मंदिरापर्यंत दंडस्थान घेत भाविक येत असतात मेढा यात्रेत व्यापाऱ्यांची लाखोंची उलाढाल होत असते. 

यामध्ये अनेक प्रकारचे लहान मुलांचे खेळ खेळणी पाळणे यात्रेत उपलब्ध असतात याचा पूर्ण उपभोग बाल चमू घेत असतात, भैरवनाथ यात्रा कमिटी दरवर्षी मनोरंजनासाठी सर्व तमाशा रसिकांसाठी सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले होते, यात्रेच्या मुख्य दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान होत असते यामध्ये महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकीन सहभाग घेत असतात.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मेढा (जावली)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने