सरपंच-उपसरपंचांच्या मानधनात वाढ; राज्य सरकारने जारी केला जीआर

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी



सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या प्रयत्नाला मोठं यश, प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी मानले राज्य सरकारचे आभार 

सरपंच यांचे मानधन वाढवून त्याच्या अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी , जावली तालुका अध्यक्ष पुंडलिक पार्टे व कार्यकारणीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहे. 



मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी २४ सप्टेंबर रोजी सरकारने सरपंच आणि उपसरपंचांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. गावातील वाहन चालविणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय २४ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

नंतर त्याच दिवशी या निर्णयाबाबतचा सहकारी आदेश जारी करण्यात आला तथात्वे नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरही राज्यातील २७, ६५१ ग्रामपंचायत मधील सरपंच आणि उपसरपंच यांना अजूनही दुप्पट वेतन मिळत नव्हते मानधन वाढवूनही वाढीव पगार मिळत नव्हते.
मानधन वाढवून हे वाळू पगार मिळत नसल्याने तक्रारी येत होत्या यावर निर्णय घेत राज्य सरकारने गुरुवारी पगारवाढीचा अधिसूचना जारी केली या निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम २०२४ - २५ या आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ ते आगामी कालावधीपर्यंत देण्यात येणार आहे याकरता राज्य सरकारने अनुदानाची रक्कम आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १६ महिन्याच्या किमान वेतनाची थकबाकी वाटप आणि खर्च करण्यास मान्यता दिली आहे.

सरपंच परिषद सरकारच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करत आहे.
मागील अनेक दिवसापासून सरपंच , उपसरपंच , सदस्यांचे मानधन वाढावे याकरता वेळोवेळी राज्यभरातील सरपंचांनी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या माध्यमातून मागणी केलेले आहे याबाबत अनेक वेळा पाठपुरावाही केला राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले त्यामुळे राज्य सरकारने या गंभीर मागणीची दखल घेऊन सरपंच , उपसरपंच , सदस्यांच्या मानधनात वाढ केली आहे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने मी मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी महाराष्ट्र पुण्यभूमीशी बोलताना दिले आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / मुंबई

Post a Comment

Previous Post Next Post