पहाटेची वेळ, मिट्ट अंधार; 'त्या' निर्णयानं तरुणीचा घात; अवघं ४० मीटरचं अंतर, डेपोत काय घडलं?

पुण्यात भल्या पहाटे स्वारगेट एसटी आगारात बलात्काराची घटना घडली आहे. एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. आरोपी तरुणानं गोड बोलून पीडितेला फूस लावली. फलटणला निघालेल्या तरुणीला त्यानं शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.


पुणे : पुण्यात भल्यापहाटे स्वारगेट एसटी आगारात बलात्काराची घटना घडली आहे. एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. आरोपी तरुणानं गोड बोलून पीडितेला फूस लावली. फलटणला निघालेल्या तरुणीला त्यानं शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. कायम वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी आगार परिसरात तरुणीवर बलात्कार झाल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुण्यातील रुग्णालयात समुपदेशक म्हणून काम करणारी फलटणला जाण्यास निघाली होती. तिचं कुटुंब फलटणला वास्तव्यास असतं. तिथे जाण्यासाठी तरुणी पहाटेच्या सुमारास एसटी आगारात आली. त्यावेळी दत्तात्रय गाडे नावाचा तरुण तिथे आला. ताई, तू कुठे चालली आहेस, अशी विचारणा त्यानं केली. त्यावर पीडितेनं फलटणला निघाल्याचं सांगितलं. त्यावर आरोपी म्हणाला, फलटणची बस तर तिकडे लागली आहेस. तू इथे काय करतेस? त्यावर साताऱ्याला जाणाऱ्या बस इथेच लागतात, असं उत्तर तरुणीनं दिलं. त्यावर आरोपी म्हणाला, ती बस रात्रीची लेट झाली आहे. तू जा पटकन. मी तुला बसवतो, असं म्हणून आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीला शिवशाही बस क्रमांक MH 06 BW 0319 मध्ये घेऊन गेला.

पीडित तरुणी साताऱ्याला जाणाऱ्या बस जिथे लागतात, तिथेच उभी होती. पास केंद्राजवळ ती बसची प्रतीक्षा करत होती. पण आरोपी तिला तिथूनच ३० ते ४० मीटर अंतरावर असलेल्या शिवशाहीकडे घेऊन गेला. ही बस बंद होती. ती आगाराच्या मध्यभागी उभी होती. तरुणानं गोड बोलून तरुणीला शब्दांत अडकवलं. त्यानं ताई म्हटल्यानं तरुणीनंही त्याच्यावर विश्वास टाकला आणि ती पास केंद्रावरुन निघाली आणि शिवशाही बसजवळ पोहोचली. तरुणावर विश्वास टाकून पास केंद्र सोडून बसजवळ जाण्याचा तिचा निर्णय घात करणारा ठरला.

आगाराच्या मध्यभागी असलेल्या शिवशाही बसमध्ये पूर्ण अंधार होता. त्यामुळे पीडितेला संशय आला. हे पाहताच आरोपी गाडे पीडितेला म्हणाला, रात्री उशीर झाला आहे. त्यामुळे प्रवासी झोपलेले असतील म्हणून लाईट बंद केले आहेत. तू वर चढ आणि टॉर्च लावून पाहा असं गोड बोलून आरोपी गाडे हा पीडितेला बसमध्ये घेऊन गेला आणि पाठोपाठ तोही त्या गाडीमध्ये चढला. बसमध्ये चढताच गाडेनं दरवाजा लावून घेतला आणि पीडितेसोबत अतिप्रसंग केला आणि पसार झाला.


न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / पुणे

Post a Comment

Previous Post Next Post