तीर्थक्षेत्र कुसुंबी यात्रेसाठी प्रशासन सज्ज

प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे 

कुसुंबी (जावली) : श्री.काळेश्वरी देवीची यात्रा दिनांक १५ फेब्रुवारी (छबिना) तर१६ फेब्रुवारी रोजी (यात्रा) मुख्य दिवस आहे. काळेश्वरी देवीच्या यात्रेसाठी अखंड महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जावली प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. या अनुषंगाने आज काळेश्वरी देवी मंदिरात तहसीलदार श्री.हनुमंत कोळेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन मीटिंग लावण्यात आली होती. 

तहसीलदार हनुमंत कोळेकर साहेब यांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यामध्ये गटविकास अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव, महावितरणचे अभियंता सुरेश कुंभार, बांधकाम विभागाचे अधिकारी कोंढाळकर साहेब, एस.टी आगार प्रमुख निता बाबर मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुर जगदाळे, तलाठी बाळासाहेब करचे, इ.उपस्थित होते. 

तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी या सर्व अधिकाऱ्यांना यात्रा काळात दक्ष राहून आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या आणि यात्रा काळात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असणार या बाबतीत संपूर्ण आढावा घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीसाठी कुसुंबीचे लोकनियुक्त सरपंच मारुती चिकणे, उपसरपंच निवृत्ती मोरे, कर्तव्यदक्ष पोलीस पाटील एकनाथ सुतार, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास वेंदे, सचिव किसनराव चिकणे, विश्वस्त संतोष चिकने तसेच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, नेहरू युवा मंडळ सर्व पदाधिकारी, महिला वर्ग, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीटिंग दरम्यान तहसीलदार हनुमंत कोळेकर साहेब यांनी छबीना मार्गाची पाहणी केली. आलेल्या सर्व अधिकारी, पदाधिकारी यांचे आभार सरपंच मारुती चिकने यांनी मानले.



न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / कुसुंबी (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post