प्रतिनिधी : श्री.लालासाहेब माने (पाटील)
वडूज (सातारा) : 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजमन्नार एम एस सेना मेडल आणि सुभेदार मेजर तानाजी भिसे सुभेदार संभाजी शिंदे यांनी आज वडूज येथे वीर जवानाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची भेट घेतली. वीर जवान चंद्रकांत काळे हा 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन साताराचा माजी एनसीसी कॅडेट व वडूज शिक्षण विकास मंडळाचे हुतात्मा परशुराम विद्यालय व जुनिअर कॉलेज वडूज चा माजी विद्यार्थी आणि विर पत्नी या ही हुतात्मा च्या विध्यार्थिनी आहेत आज त्यांच्या कुटुंबियांना भेटत असताना उपस्थित अधिकारी वर्गाच्या डोळ्यातून अश्रू आले. विरपत्नी आणि त्यांची दोन लहान मुले यांच्याकडे पाहिल्यावर कोणाचेही हृदय भरून येईल अशी परिस्थिती असताना कर्नल साहेबांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.
वीर जवानाचे युनिट मेरठ दिल्ली या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी कर्नल साहेबांचेही युनिट आहे आपणास काही अडचण आल्यास मला डायरेक्ट कॉल करू शकता असा दिलासा साहेबांनी वीर जवानाच्या कुटुंबीयांना दिला. त्यांच्या सोबत सुभेदार मेजर तानाजी भिसे, सुभेदार संभाजी शिंदे, हुतात्मा चे एनसीसी अधिकारी चीफ ऑफिसर राजेंद्र जगदाळे उपस्थित होते.
सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा आहे आणि माण खटाव तालुक्यामध्ये सैन्य दलामध्ये सेवा करणारे अनेक अधिकारी व जवान आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्याचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले.
यावेळी वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मनीषा रवींद्र काळे कार्यकारी नगरसेवक रवींद्र काळे , शहीद जवानांचे वडील आई व त्यांचा मुलगा मुलगी, त्यांचे भाऊ हिराचंद काळे बाळासाहेब रामभाऊ काळे उपस्थित होते.
ज्या दिवशी पार्थिव वडूजला आणले त्यावेळी त्यांची वडूज मधून अभिवादन फेरी काढत असताना छ शिवाजी हायस्कूल आणि हुतात्मा हायस्कूल दोन्ही शाळांचे छात्र सैनिक मानवी साकळी करून शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देत गावातून फेरी काढली त्यामध्ये सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल दोन्ही शाळाना धन्यवाद दिले. कमांडिंग अधिकारी यांच्या भेटीमुळे शहीद जवानाच्या कुटुंबाला दिलासा मिळाला नगराध्यक्षा सौ मनीषा रविद्र काळे यांनी आभार व्यक्त केले.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / वडूज (सातारा)

Post a Comment